VIDEO : धडकी भरवणारं वास्तव ! इटलीप्रमाणे ठाण्यातही रुग्ण तडफडतोय ऍम्ब्युलन्ससाठी..

राजेश मोरे 
शुक्रवार, 8 मे 2020

तो दिड तास रुग्णवाहिकेसाठी तडफडत होता, आरोग्य विभागाच्या गोंधळामूळे नागरिकही हतबल

ठाणे शहरात आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने या आजाराची भीती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टेंभी नाका येथील महापालिकेच्या वाडिया हाॅस्पिटलमध्ये कोरोनाची तपासणी करण्यासाठी आलेल्या एका तीस वर्षीय तरुणाला तब्बल दिड तास रुग्णवाहिकेसाठी तडफडत राहावे लागण्याची हदयद्रावक घटना घडली आहे. जोरदार येणारा खोकला आणि सातत्याने सुरु असलेल्या या रुग्णाच्या तडफडीमूळे इच्छा असूनही येथे उपस्थित असलेल्या लोकांना त्याला मदत करता येत नव्हती. पण या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागाचा किती बोजवारा उडाला याची झलक पाहावयास मिळाली आहे.

अरे बापरे ! "जून आणि जुलैमध्ये येणार कोरोनाची मोठी लाट"

महापालिकेच्या वतीने टेंभी नाका येथे वाडिया हाॅस्पिटलमध्ये कोरोनाची तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी या परिसरातील संशयित तपासणीसाठी येत असतात. असाच एक रुग्ण काल सायंकाळी वाडिया हाॅस्पिटल येथे आला होता. पण हाॅस्पिटलच्या तपासणीचे कामकाज सहापर्यंत संपल्यानंतर येथे कोणीही नव्हते. त्यामूळे या रुग्णाला आता कोठे जावे हे कळत नव्हते. त्याला जोरजोराने खोकला येत होता. तसेच त्याची थोड्या थोड्या वेळाने प्रचंड तडफड होत होती. त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो आरडाओऱडा करुन आपल्या जवळ येऊ नये सांगत होता. त्यानंतर कोणी चुकून जवळ आल्यास जवळ दिसेल ती वस्तू हा रुग्ण या लोकांवर फेकून मारत होता. आपल्यामूळे आपल्या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून तो स्वतःहू काळजी घेत होता. पण याच दिड तासाच महापालिकेच्या आरोग्य सेवेचा बोजवारा पाहावयास मिळाला.

क्या बात हैं ! 18 वर्षीय अर्जुन देशपांडेच्या कंपनीत रतन टाटांची गुंतवणूक, अर्जुनच्या बिझनेसमुळे टाटा इम्प्रेस...
 

या रुग्णाची माहिती मिळाल्यानंतर याच परिसरात कार्यरत असलेले शिवसेनेचे नगरसेवक सुधीर कोकाटे आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोचले. त्यावेळी तो रुग्ण हात जोडून आपल्याला रुग्णालयात दाखल करावे अशी विनवणी करीत होता. त्यामूळे त्यांनी तत्काळ महापालिकेत संपर्क साधून रुग्णवाहिका मागवली. पण हा रुग्ण दिड तास तडफडत असतानाही रुग्णवाहिकेचा पत्ता नव्हता. अखेर कोकाटे यांनी ही माहिती महापाैर नरेश म्हस्के यांना कळवली. महापैारांनी त्यांच्या पद्धतीने मग अधिकाऱयांना फैलावर घेतल्यानंतर या रुग्णासाठी रुग्णवाहिका पाठविणयात आली. तोपर्यंत या रुग्णाला लांबून पाण्याचा बाटल्या दिल्या जात होत्या. त्या रुग्णाला सातत्याने तहान लागत असल्याने काही मिनिटात तो या बाटल्या रिकाम्या करीत होता. त्याची तडफड पाहून येथे जमलेल्या अनेक लोकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. आतापर्यंत केवळ सोशल मिडियावर चर्चेतून अशी विदारक दृश्य पाहत असताना गुरुवारी सायंकाळी ही तडफड थेट पाहताना अनेकांचा थरकाप उडाला होता.

मद्यप्रेमींनो खुशखबर ! आता दारुसाठी फटके खाण्याची अजिबात गरज नाही, कारण.. 

एवढी धावपळ करुन रुग्णवाहिका आल्यानंतर रुग्णवाहिकेतील कर्मचाऱयांनी रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यासाठी पोलिसांना सोबत येण्यास सांगितले. मूळात येथे ठाणे नगरचे पोलिस  कडे करु उभे असल्याने त्यापैकी एकाने तत्काळ सोबत येण्याची तयारी दर्शवली. त्यामूळे या रुग्णाला रुग्णवाहिकेतून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. या रुग्णाला कोविड झाला की नाही हे स्पष्ट झाले नाही. पण भविष्यात असा कोणत्याही आजाराचा रुग्ण अशाप्रकारे रस्त्यावर कोसळल्यास त्याच्यावर अशीच भीतीदायक परिस्थिती उद्धभवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

horrible scene on the road of thane patient waited for ambulance almost for ninety minutes


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: horrible scene on the road of thane patient waited for ambulance almost for ninety minutes