महत्वाची बातमी! रुग्णालयांची माहिती आता एका 'क्लिक'वर; बेड, दर यांसह तक्रारींंसाठी 'कॉमन डॅशबोर्ड'

महत्वाची बातमी! रुग्णालयांची माहिती आता एका 'क्लिक'वर; बेड, दर यांसह तक्रारींंसाठी 'कॉमन डॅशबोर्ड'

मुंबई: कोरोना रुग्णांची बेडसाठी होणारी फरफट, खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी सरकारने पावलं उचलली आहेत. 'कॉमन डॅशबोर्ड'च्या माध्यमातून उपलब्ध बेड, रुग्णालय आणि तिथले दर आता रुग्णांना जाणून घेता येणार आहेत. इतकेच नाही तर रुग्णांना आता आपली तक्रार देखील नोंदवता येणार असून तक्रारींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देखील सरकारने दिले आहेत.

नक्की काय असणार आहे 'कॉमन डॅशबोर्ड' 
मुंबईत करोना बाधित रुग्णांची सांख्या वेगाने वाढत आहे. त्यातच कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत , शिवाय  रुग्णालयात रुग्णांंवर करण्यात आलेल्या उपचारांसाठी वाटेल तेव्हढा खर्च लावण्यात येतो , यासह रुग्णालयांची तक्रार करायची असल्यास ती आता ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. लवकरच रुग्णालयातील उपलब्ध बेडस ची संख्या ही ऑनलाइन पद्धतीने सर्वांना उपलब्ध करून देणार येणार आहे. कोरोना विषाणूंना रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे . आवक खासगी रुग्णालये रुग्णांना दाखल तर करून घेत आहेत मात्र त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचारासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारत आहेत. अश्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली . आता ज्या रुग्णांना एखाद्या रुग्णालयाची तक्रार करायची असल्यास त्यांना complaints. healthcharges@jeevandaye.gov.in या इमेल आयडीवर पाठवू शकतात. संबंधितांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी , पालिका आयुक्त , राज्य आरोग्य सेवा समितीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती ही टोपे यांनी दिली.

कोरोना रुगणांची संख्या दररोज वाढत बेडसाठी रुग्णांची फरफट सुरू आहे. पुढील काळात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या अंदाजानुसार मुंबईसह राज्यात बेड उपलब्ध करण्यात येत आहेत. मात्र यासंबंधीची माहिती सर्व सामान्य नागरिकांना किंवा अम्ब्युलन्स चालकांना नसते. त्यामुळे रुग्णांना घेऊन एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात घेऊन फिरावे लागते. यावर पर्यायी मार्ग काढण्यात आला असून सर्व रुग्णालयातील खाटांची माहिती ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी कॉमन डॅशबोर्ड तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून हा डॅशबोर्ड सर्व प्रमुखांकडे तसेच अम्ब्युलन्स चालकांकडे ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी दर निश्चित करण्यात आले असून त्यात साधे बेड , ऑक्सिजनची व्यवस्था आणि अतिदक्षता विभागातील बेड यासाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. या आदेशानुसार कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी दर आकारणीचे तीन स्तर निश्चित करण्यात आले आहेत. दिवसाला 4 हजार , 7,500 आणि 9 हजार असे दर आकारणीचे बंधनकारक करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांसाठी आपली सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. https://charity. maharashtra.gov. in/en-us/view-hospital-details-in-us या लिंकवर चॅरिटेबल रुग्णालयांतील उपलब्ध बेडस ची संख्या जाणून घेता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com