
Hostel children's agitation for food allowance
ESakal
ठाणे : आदिवासी विकास विभागामार्फत उभारलेल्या वसतिगृहात अनेक विद्यार्थी शिक्षणानिमित्त वास्तव्यास आहेत. घरापासून लांब असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून आहार भत्ता देण्यात येतो; मात्र हा भत्ता दोन ते तीन महिने उशिराने मिळत असल्याने याच्या निषेधार्थ ठाण्यातील अप्पर आयुक्त आदिवासी विभाग कार्यालयावर सोमवारी (ता. १५) आदिवासी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना नवीन दराने आहार भत्ता मिळावा, अशी मागणीदेखील आंदोलक विद्यार्थ्यांनी या वेळी केली.