पत्नीच्या अंगावर फेकला गरम चहा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

ठाणे - कार्यक्रमाला सोबत येऊ का? असे विचारल्याने संतापलेल्या पतीने पत्नीवर गरम चहा फेकल्याचा प्रकार रविवारी वर्तकनगर येथे घडला.

ठाणे - कार्यक्रमाला सोबत येऊ का? असे विचारल्याने संतापलेल्या पतीने पत्नीवर गरम चहा फेकल्याचा प्रकार रविवारी वर्तकनगर येथे घडला.

मिहीर रणनवरे (वय 43) असे पतीचे नाव आहे. पत्नीच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात वर्तकनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला डॉक्‍टर असून, रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे पती चहा पीत होता. तेव्हा तिने कार्यक्रमाला सोबत येण्याबाबत विचारले. त्याचा राग आल्याने पतीने गरम चहाचा कप तिच्यावर फेकून मारला. त्यातील गरम चहा अंगावर पडल्याने ती जखमी झाली. त्यानंतर आरोपीने मुले आणि आपल्याला शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे, अशी माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.

Web Title: Hot tea throw on the wife's body crime