तो सतत तिचे चुंबन घ्यायचा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पंचतारांकित हॅाटेलमध्ये घडत होता प्रकार

मुंबई : गोरेगाव पूर्वेच्या पश्चिम द्रुतगती मार्गालगतच्या एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून तेथील एका अधिकाऱ्याला चुंबन घेणे चांगलेच महाग पडले आहे. 

हेही वाचा - दोन तास चार्च करा, 120 किलोमीटर पळवा

संबधित हाॅटेल मागील काही दिवसांपासून एका वेगळ्याच मुद्द्यामुळे चर्चेत होते. कारण याच हॉटेल मध्य़े एका मॉडेलला सेक्‍स रॅकेटच्या आरोपात अटक करण्लीयात आली होती. दरम्यान पुन्हा एकदा या चुंबन प्रकरणाने हे हाॅटेल चर्चेत आले आहे. हाॅटेलमधील एक सहाय्यक व्यवस्थापक सोबतच्या महिला कर्मचाऱ्याला सतत चुंबन घेऊन त्रास देत होता. तसेच मानसिक आणि शारीरिक छळ देखील करत होता. त्यामुळे महिलेने त्याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहेे. 

या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी सुनील बाबूलाल यादव (30) याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे . 354, 354 ड, 342, 323 व 506 या कलमाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सुनील यादव हा विवाहित असून तो हॉटेल मधील एका अविवाहित असलेल्या कर्मचारी महिलेला मागील चार महिन्यांपासून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. सुनील जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या महिलेचे चुंबन घेत असे . याशिवाय मोबाईल वर तिला अश्‍लील व्हिडीओ ही दाखवीत होता. पीडित महिला मात्र इतक्या चांगल्या पगाराची नोकरी जाण्याच्या भीतीने सर्व निमुटपणे  सहन करत राहिली. मात्र दिवसेंदिवस सुनीलचा त्रास वाढल्याने अखेर कंटाळून तिने दिंडोशी पोलीस स्टेशन गाठत सुनीलची तक्रार नोंदविली. 

web title : hotel assistant manager arrested for kissing 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hotel assistant manager arrested for kissing