

Hotel Association advised to hotel owners
ESakal
मुंबई : आखाती देशातील युद्धामुळे देशभरात गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जास्त गॅस लागणारे पदार्थ मेनूत न ठेवण्याचा सल्ला हॉटेल संघटनेने हॉटेलचालकांना दिला आहे. अशा पदार्थांसाठी इंडक्शन कुकटॉप किंवा कन्व्हेक्शन ओव्हन वापरण्याचे आवाहनही हॉटेलचालकांना करण्यात आले आहे. फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया आणि हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडिया यांनी याबबात हॉटेल चालकांना सूचना केल्या आहेत.