
New Year : 31st साठी हॉटेल इंडस्ट्री सज्ज; महिला सुरक्षेवर अधिक भर; शिवानंद शेट्टी
मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील हॉटेल इंडस्ट्री सज्ज झाली आहे. हॉटेल मध्ये होणारी गर्दी लक्षात घेत सुनियोजित सेवा देण्यासाठी काही हॉटेल चालकांनी ऑनलाइन बुकिंग वर जोर दिला आहे.
तर यावेळी हॉटेल मालकांनी महिला सुरक्षेवर आधी भर दिल्याचे आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच तयारीला लागले आहेत. आठवडाभर ग्राहकांच्या गर्दीमुळे हॉटेल व्यवसाय तेजीमध्ये असतो.
करोना काळानंतर खऱ्या अर्थाने हे वर्ष बंधांमुक्त असल्याने हॉटेल इंडस्ट्री ही ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ख्रिस्तमस च्या आधीपासून यासाठी तयारी करण्यात येत असून पुढे आठवडाभर हॉटेल इंडस्ट्री तेजीत असते.
31st चा आनंद घेण्यासाठी लोक कुटुंबासह हॉटेलिंग करण्यावर अधिक भर देतात. यामुळे यावेळी हॉटेल तसेच रेस्टरांत अँड बार मालकांनी ग्राहकांच्या सुरक्षेवर अधिक भर दिल्याचे शिवानंद शेट्टी यांनी सांगितले. खास करून महिला सुरक्षेवर अधिक लक्ष दिले जात आहे.
यासाठी हॉटेल व बाहेरच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा ची नजर तर आहेच शिवाय सर्व्हिस बॉय,वेटर,कर्मचारी यांना देखील प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच गर्दी होणाऱ्या हॉटेल मध्ये पर्याप्त सुरक्षा रक्षक नेमले आहेत.
गरजेनुसार काही ठिकाणी बाऊनसर ची व्यवस्था असल्याचे ही शेट्टी म्हणाले.विकेंड ला ग्राहकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यादरम्यान नेहमीपेक्षा ३५ते ४० टक्के ग्राहक वाढण्याचा अंदाज आहे.
यामुळे गोंधळ होऊ नये यासाठी अनेक हॉटेल चालकांनी ऑनलाइन बुकिंग वर भर दिला आहे. ऑनलाइन बुकिंगमुळे आपली वेळ,आपला टेबल आणि आपली ऑर्डर वेळेत तयार होणार असल्याने गर्दी किंवा गोंधळ टाळता येणार आहे.
शिवाय कोणत्याही त्रासाशिवाय कुटुंबाला आपल्या आवडत्या खाद्यावर ताव मारत आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवता येणार आहे. मुंबईत पार्किंग आणि ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पार्किंग साठी शक्य तितकी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही हॉटेल बाहेर वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी होते.
त्यासाठी काही हॉटेल चालकांकडून खासगी ट्रॅफिक वॉर्डन उभे केले जात आहेत. बाकी दरवर्षी प्रमाणे हॉटेल ला रंगरंगोटी आणि आकर्षक लायटिंग ही केली आहे. कोरोनामुळे हॉटेप इंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहे. त्यातून सावरून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न हॉटेल चालक करत आहेत.