महामार्गावर तासाभरात दोन अपघात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

मनोर ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळेजवळच्या वाघोबा खिंडीत मुंबई मार्गिकेवरील भरधाव कारचा टायर फुटल्याने ती दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या कारला धडकली; तर हालोली पाटील पाडा परिसरात जिवंत माशांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यावर उलटला. यात टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला; तर कार अपघातातील जखमींना वसईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महामार्गावरील मुंबई मार्गिकेवर गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भरधाव कारचा टायर फुटल्यामुळे कार दुभाजक ओलांडून गुजरात मार्गिकेवरून येणाऱ्या कारला समोरून धडकली. त्यामुळे झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. दोन्ही कारमधील सुमारे सहा ते सात प्रवासी जखमी झाले, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. एका तासाच्या अंतरामध्ये महामार्गावर दुसरा अपघात घडला.

महामार्गाच्या गुजरात मार्गिकेवर हालोली पाटील पाडा परिसरात कैलास सरोवर हॉटेलजवळ अरुंद रस्त्यावर दुपारी एकच्या सुमारास जिवंत माशांची वाहतूक करणारा छोटा टेम्पो रस्त्यावर उलटला. छोट्या टेम्पोत जिवंत मासे भरून जात असताना अरुंद रस्त्यावर चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. त्यामुळे जिवंत मासे रस्त्यावर विखुरले. अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In an hour on the highway Two accidents in Manor