बांधकाम सुरू असताना दुमजली घर कोसळले

बांधकाम सुरू असताना दुमजली घर कोसळले

धारावी - धारावीतील ६० फुटी रस्त्यावरील दुमजली घर बांधकाम सुरू असताना गुरुवारी (ता. २५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोसळले. या दुर्घटनेत पाच वर्षांच्या मुलीसह आठ जण जखमी झाले. त्यांच्यावर लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धारावीतील मदिना कंपाऊंड येथील नियोजित जनता गृहनिर्माण संस्थेतील जुने घर पडून दुमजली घर बांधण्याचे काम काही दिवसांपासून सुरू होते. अर्धवट बांधकाम झालेले हे घर गुरुवारी अचानक हलू लागले. त्यानंतर पाहता-पाहता हे घर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. या दुर्घटनेत एक कामगार, शेजारच्या घरातील रुकिया बानो (१७), मोहम्मद रफिक (२२), जहानआरा खान (४०), मोहम्मद रिझवान शेख (१५), मोहम्मद राहजीत (२२), पप्पू यादव (२२), नवल राय (२४) व रश्‍मी खान (५) हे किरकोळ जखमी झाले. 

कोसळलेल्या घराजवळील पायवाट अरुंद असल्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यात अडचणी आल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com