घराच्या ‘स्वप्नपूर्ती’साठी पायपीट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

नवी मुंबई - सिडकोच्या स्वप्नपूर्ती प्रकल्पातील लाभार्थींना घराचा ताबा देण्याचे काम सिडकोने गेल्या महिन्यापासून सुरू केले आहे; परंतु ते संथ गतीने सुरू आहे. आधीच येथे कर्मचाऱ्यांची कमतरता असताना अर्धे अधिक कर्मचारी वेगवेगळ्या ट्रेनिंगसाठी जात आहेत. त्यामुळे रायगड भवनमधील सिडकोच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांचा शुकशुकाट असल्यामुळे स्वप्नपूर्तीच्या लाभार्थींना कामासाठी पायपीट करावी लागत आहे.

स्वप्नपूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. २ मे ही शिल्लक पैसे भरण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे लाभार्थींनी सिडकोकडे पैसे जमा केले. दोन महिन्यांपूर्वी सिडकोने काही लाभार्थींना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे घरांच्या चाव्या कधी मिळणार याकडे सर्वांचे लागले आहे. घराचा शेवटचा हप्ता भरल्यानंतर संबंधित लाभार्थीची फाईल अकाऊंट विभागात पाठवली जाते. तिथे पूर्ण पैसे भरणा केल्याची शहानिशा झाल्यावर ती पुन्हा संबंधित विभागात पाठवली जाते. नंतर स्टॅम्प ड्युटीचे पैसे बॅंकेत जमा करण्यास सांगितले जाते. ती भरल्यावर सिडको आणि लाभार्थी यांच्यात करार केला जातो. तो झाल्यावर घराची चावी मिळते; परंतु आता ज्यांनी पैसे पूर्ण भरले आहेत. त्यांच्या फाईल्स अकाऊंट विभागात पडल्या आहेत. त्यांची तपासणी करून त्या परत संबंधित विभागात पाठवण्यासाठी येथे पुरेसे कर्मचारी नाहीत. कारण येथील अनेक कर्मचारी दररोज ट्रेनिंगला जात आहेत. अनेकांकडे त्यांच्या खात्याच्या अकाऊंटचे काम आहे. ते त्यांना या महिन्यातच पूर्ण करायचे असल्यामुळे ते त्या कामाला प्राधान्य देत आहेत. या सर्व प्रकारामुळे स्वप्नपूर्तीच्या घरांचा ताबा देण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे लाभार्थींना या कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत.

Web Title: House dreamer