निवडणुकीच्या मोसमात घरफोड्यांचा उच्छाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

ठाणे - ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमुळे पोलिस व्यस्त असल्याचा फायदा चोरटे उठवत आहेत. कळवा, मुंब्रा-दिवा आणि वागळे इस्टेट परिसरात अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून लाखोंचा मुद्देमाल पळवला. विशेष म्हणजे, दिवा येथील घटनेत चोरट्यांनी गृहिणीचे शाळेचे दाखले आणि दहावी-बारावीची मार्कशीटही पळवल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. तीन लाख ८१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले आहेत.

दिवा-साबेगाव येथील विजयानंद पांचाळ कुटुंबीयांसह नजीकच्या जुन्या घरी झोपण्यासाठी गेले होते. तेव्हा रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा उचकटून कपाटातील एक लाख ९१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल आणि त्यांच्या पत्नीची शालेय प्रमाणपत्रे व दाखले लांबवले. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत कळवा, वाघोबानगर येथील समीर साहू यांचे घर फोडून ६८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी कळवा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तिसरी घटना लुईसवाडी येथे घडली. साईनाथनगर, लुईसवाडीतील विजय चिकणे यांचे कुटुंब घरात गाढ झोपेत असताना चोरट्याने एक लाख २२ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Housebreaker of the election season

टॅग्स