
Housing Department
ESakal
मुंबई : वर्षावर्षे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या जोगेश्वरी पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हाडाने या प्रकल्पासाठी काढलेल्या निविदेला गृहनिर्माण विभागाने अंतिम मंजुरी दिली असून त्याबाबतचा कार्यादेश जारी केले आहेत. सुमारे ४७२ कोटी रुपये खर्चून येथील १७ इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामुळे येथे वास्तव्यास असलेल्या ९८४ सदनिकाधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.