सिडकोच्या लॉटरीमधील घरांच्या किंमती वधारल्या; वाचा किती झालीये वाढ?

शरद वागदरे : सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

सिडकोकडून घणसोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी, व कंळबोली या ठिकाणी पोलीसांसाठी काढण्यात आलेल्या लॉटरीमधील घरांच्या किंमती दोन ते अडीच लाखांने वधारल्या असल्याचे पाहायला मिळत आहेत.

वाशी : नवी मुंबई क्षेत्रातील घणसोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी व कळंबोली या भागामधील 14 हजार 138 घरांसाठी सिडकोकडून लॉटरी काढण्यात आली होती. दोन वर्षापुर्वी काढण्यात आलेल्या या लॉटरीच्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या घरांची किंमत ही 18 ते 19 लाखांच्या दरम्यान होती. तर अल्प घरांच्या घरांची किंमत ही 25 ते 27 लाखांच्या दरम्यान होती. मात्र सिडकोकडून घणसोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी, व कंळबोली या ठिकाणी पोलीसांसाठी काढण्यात आलेल्या लॉटरीमधील घरांच्या किमंती दोन ते अडीच लाखांने वधारल्या असल्याचे पाहायला मिळत आहेत.

ही बातमी वाचली का? मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट, अटक केलेल्या महिलेचं भाजप कनेक्शन

 
सिडकोच्या वतीने अल्प व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांकरीता दोन वर्षापुर्वी 15 ऑगस्ट 2018 रोजी 14 हजार 138 घरांसाठी गृहनिर्माण योजना जाहीर केली होती. या लॉटरीच्या घरांना उदंड असा प्रतिसाद मिळाला होता. या लॉटरीनंतर सिडकोचा एक लाख घरे बांधणाचा मानस असून, 2019 मध्ये देखील दहा हजार घरांची लॉटरी काढण्यात आली होती. याला देखील चांगल्या पध्दतीने प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा सिडकोकडून महाविकास आघाडी सरकांरच्या नेतृत्वाखाली पोलीसांसाठी घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील सुमारे 4 हजार 500 घरे ही घणसोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी व कंळबोली या ठिकाणीची काढण्यात आली आहे. 

ही बातमी वाचली का? मुसळधार पावसाचा फटका 'कोविड केअर सेंटर'ला, रुग्णांचे प्रचंड हाल

याला देखील पोलीसांकडून उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. मात्र या घरांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. अल्प व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील दोन्ही घरांच्या दरांमध्ये दोन ते अडीच लाखांने वाढ झाली आहे. दोन वर्षापुर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीतील 14 हजार 138 घरांचे काम हे प्रगतीपथावर असून, अंतिम टप्पयात काम सुरु असून लवकरच घरांचा ताबा देण्यात येणार आहे. 

सिडकोकडून रेडीरेकनरच्या दरांनुसार घरांच्या किंमती ठरवल्या जातात. त्यानुसार या घरांच्या किंमतीची दर ठरले आहे. 
प्रिया रांताबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

-------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Housing prices rise in CIDCO's lottery; An increase price two to two and a half lakhs