दहा मिनिटांचं मौन आंदोलन आणि दीपिकाचा मास्टरस्ट्रोक...

दहा मिनिटांचं मौन आंदोलन आणि दीपिकाचा मास्टरस्ट्रोक...

मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यपीठातील विद्यार्थ्यांवरील हल्ला असो किंवा CAA अथवा NRC सारखे मुद्दे. बॉलिवूडमधील कलाकार आंदोलनांमध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावताना दिसतायत आपलं मत मांडताना दिसतायत. अशात दीपिका पदुकोणच्या दिल्लीतील जेएनयूतील दहा मिनिटांच्या मौन आंदोलनाने सोशल  मीडियावर छपाक (Chhapaak) सिनेमाला थेट टॉप ट्रेंडिंगवर नेऊन ठेवलं. अशात खरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे, खरंच दीपिकाने JNU विद्यार्थ्यांसाठी या आंदोलनात सहभाग घेतला की आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी या सर्व खटाटोप केला ?  

जर खरंच दीपिकाने आपल्या सिनेमाच्या पब्लिसिटीला मदत होण्यासाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनात हजेरी लावली असेल तरी देखील दीपिकाने खूपच हिमतीचं पाऊल उचललं आहे असंच म्हणावं लागेल. याला कारण म्हणजे दीपिकाच्या अशा वागण्याने एका विचारधारेचे लोकं दीपिकाच्या सिनेमाला बॉयकॉट करा, वाळीत टाका अशी मागणी करू शकतात. तसं झालेलं देखील आपल्याला पाहायला मिळालं. ट्विटरवर आपण ते पाहिलं. खरंतर दीपिका स्वतः या सिनेमाची निर्माती आहे आणि म्हणूनच दीपिकाने उचलेल्या या पावलाची अनेक बॉलिवूड कलाकारांकडून प्रशंसा केली जातेय.  

या आधी दीपिकाचा पद्मावत हा सिनेमा आला होता. तेंव्हा देखील मोठ्याप्रमाणावर वाद विवाद झाले होते. आंदोलनं देखील झाली होती. दीपिकाच्या पद्मावत सिनेमाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं होतं. यावर करणी सेनेने मोठ्याप्रमाणात विरोध दर्शवत आंदोलनं केली होती. सिनेमातील अनेक कलाकारांना आणि दीपिकाला जिवेमारण्याच्या धमक्या देखील आल्या होत्या. म्हणूनच या सिनेमाचं नाव पद्मावती वरून पद्मावत ठेवण्यात आलं होतं. मात्र, सर्व विरोधानंतरदेखील पद्मावतने बॉलिवूडवर जवळपास ३०० कोटी तर जगभरात एकूण ५८५ कोटीची कमाई केली होती.   

दीपिका पदुकोणच्या JNU मध्ये जाण्याने दोन विरुद्ध विचारधारेच्या गटांनी तिच्यावर आणि तिच्या सिनेमाला वाळीत टाकण्याची भाषा केलेली पाहायला मिळाली. अशात लोकांना जर दीपिकाचा सिनेमा पसंतीस पडला तर या सिनेमाला मोठ्याप्रमाणात पब्लिसिटी मिळू शकते. कारण दीपिकाचे चाहते तर या सिनेमाला हजेरी लावतीलच, मात्र मोठ्या प्रमाणात होणाऱ्या तोंडी पब्लिसिटीमुळे ज्यांना फारसा राजकारणात रस नाही असे लोक देखील हा सिनेमा पाहायला जाऊ शकतात. अशात दीपिकाच्या सिनेमाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. मात्र यासाठी दीपिकाच्या सिनेमाची ओपनिंग कशी होते आणि त्यापुढे तिच्या सिनेमाची तोंडी पब्लिसिटी किती होते हे अत्यन्त महत्त्वाचं आहे.  

मात्र लोकांना दीपिकाच्या सिनेमातील अभिनय किंवा सिनेमा फारसा पसंतीस उतरला नाही, तर याचा कसा परिणाम होईल? सर्वात आधी लोकं दीपिकाला आणि तिच्या सिनेमाला ट्रोल करायला सुरवात करू शकतात. ट्रोलिंगमुळे दीपिकाचा सिनेमा कायम चर्चेत राहील. सिनेमाची निगेटिव्ह पब्लिसिटी झाल्याने देखील सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील कमाई मात्र पॉझिटिव्ह राहील. मात्र दीपिकाचा सिनेमा आणि अभिनय अजिबातच  लोकांना आवडला नाही तर मात्र तिच्या सिनेमाला कुणीच वाचवू शकत नाही. आता दीपिकाने JNU आंदोलनात सहभागी होण्याचं उचललेलं मास्टरस्ट्रोक ठरतो का फुसका बार हे येत्या काळात स्पष्ट होईल. 

how deepika padukons visiting JNU protest site will affect on her upcoming chhapaak movie 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com