esakal | 'मनसे'चा मोठा चेहरा आता येणार जनतेसमोर, मनसेत आनंदी आनंद..
sakal

बोलून बातमी शोधा

'मनसे'चा मोठा चेहरा आता येणार जनतेसमोर, मनसेत आनंदी आनंद..

अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे सुपुत्र. अमित ठाकरे राजकारणात सक्रिय कधी होणार चाची सर्वत्र कायमच चर्चा होती. अशात आता अमित ठाकरे राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार याबात आता माहिती समोर येतेय. येत्या २३ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पाहिलं वाहिलं महाअधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनातच अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग होणार असल्याचं समजतंय. 

'मनसे'चा मोठा चेहरा आता येणार जनतेसमोर, मनसेत आनंदी आनंद..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे सुपुत्र. अमित ठाकरे राजकारणात सक्रिय कधी होणार चाची सर्वत्र कायमच चर्चा होती. अशात आता अमित ठाकरे राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार याबात आता माहिती समोर येतेय. येत्या २३ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पाहिलं वाहिलं महाअधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनातच अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग होणार असल्याचं समजतंय. 

हे भारीये एक असा देश जिथे सुरु आहे २०१३ साल, इथे वर्षात आहेत १३ महिने..

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. अशात दोनच दिवसांआधी मनसे आपला झेंडा बदलणार असल्याचं समोर आलंय. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची परळ मधील रहिवासी इमारतीमध्ये भेट घेतलीये. त्यामुळे मनसेच्या गोटात मोठ्या हालचाली नक्की सुरु आहेत असं बोलाल्याला वाव आहे. 

धक्कादायक ! ''तुमची पेटीएम सेवा २४ तासात बंद होईल, आधी नमूद केलेल्या नंबरवर फोन करा''

या सर्व घडामोडी घडत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे यांचं पोलिटिकल लॉन्चिंग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय. खरंतर अमित ठाकरे यांचा तरुण वर्गात एक मोठा चाहतावर्ग आहे. लोकांना अमित ठाकरे यांच्याबद्दल कायम एक अप्रूप आहे. ज्याचा फायदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला येत्या काळात होऊ शकतो.

महत्त्वाची बातमी : बदलत्या हवामानाचा असाही परिणाम.. 

मुंबईतील आरे कारशेडचा मुद्दा अमित ठाकरे यांनी लावून धरलेला. त्या आंदोलनात अमित यांचा सक्रिय सहभाग असल्याचं पाहायला मिळालं होतं. नवी मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी देखील अमित ठाकरे धावून आलेले पाहायला मिळाले होते. अमित ठाकरे यांनी थाळीनाद आंदोलन देखील केलं होतं. मात्र अमित ठाकरे यांनी मनसेच्या मोठ्या व्यासपीठावरून भाषण अद्याप केलेलं नाही. अशात येत्या काळात अमित ठाकरे मनसेमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रियरित्या सहभागी झालेत तर मानसे पक्षाला आणि पक्षबांधणीला मोठा फायदा होऊ शकतो.

political launching of amit thackeray will be next big step by raj thackeray and mns

loading image
go to top