'ॐ नम: शिवाय'; महाशिवरात्रीला 'असं' करा महादेवाला प्रसन्न

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

मुंबई - आज महाशिवरात्री आहे. हिंदू धर्मात भारतात महाशिवरात्रीचे विशेष महत्व आहे. यादिवशी महादेवाचे भक्तगण निरनिराळ्या प्रकारे महादेवांची पूजा करत असतात. महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करण्याचंही महत्व आहे असं ज्योतिषी सांगतात. रुद्राभिषेक केल्यामुळे महादेव प्रसन्न होतात असं पुराणात सांगितलं आहे. मात्र बहुतांश लोकांना महादेवाचा रुद्राभिषेक कसा करावा हे  माहिती नसतं. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर भगवान शंकराची रुद्राभिषेक पूजा करू शकता. 

MahaShivratri 2020 : तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; यंदाची महाशिवरात्र असणार विशेष...

रुद्राभिषेकासाठी लागणारं सामान :

गंगाजल, धूप, बेलपत्र, दही, विडयाचे पान, पूजेची सुपारी, धोत्र्याचे फूल, फळ, नारळ, शुद्धतूप, फळं, चंदन, गंध, पुष्प, हार. तसंच अभिषेकासाठी दूध, पाणी, मध, उसाचा रस इत्यादी..    

असा करा रुद्राभिषेक:

 • वरील सर्व पूजेची सामग्री स्वच्छ ठिकाणी ठेवा.
 • सकाळी शुभ मुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा.
 • रुद्राभिषेक सुरू करताना सुपारीरूपी श्री गणेशाचं पूजन करा.
 • महादेवाच्या पिंडीवर प्रथम पाणी त्यानंतर मध, उसाचा रस, दही, तूप आणि नंतर पुन्हा पाणी या गोष्टींनी अभिषेक करा.
 • रुद्राभिषेक करताना "ॐ नम: शिवाय" या मंत्राचा जप करत रहा.
 • हा जप करताना महादेवांवर गंगा जलाचा अभिषेक करा.
 • रुद्राभिषेक झाल्यानंतर महादेवाला पुष्प,गंध आणि नैवेद्य अर्पण करा.
 • यानंतर महादेवाची आरती करा.
 • तसंच गणपती,आदिशक्ती,श्रीविष्णु, ब्रह्मदेव, नवंग्रह या सर्वांचे मनोभावे पूजन करा.
 • यानंतरच संपूर्ण रुद्राभिषेक सुफळ संपूर्ण होईल.
 • यानंतर अभिषेकाच्या गंगाजलाचे तीर्थ म्हणून वाटप करा.

MahaShivratri 2020 : विहिरीतील या मंदिरात होतो शिवपार्वती विवाह सोहळा..

शिवपूजेचा मुहूर्त कोणता ?

शिवपूजेचा मुहूर्त २१ फेब्रुवारी संध्याकाळी ५.२० वाजता पासून २२ फेब्रुवारी संध्याकाळी ५.०२ वाजता पर्यन्त असणार आहे. शैव संप्रदायाप्रमाणे २१ फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येईल तर वैष्न संप्रदाय हा २२ फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करणार आहे. 

how to do authentic mahashivratri rudrabhishek puje check full procidure

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to do authentic mahashivratri rudrabhishek puje check full procedure