तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; यंदाची महाशिवरात्र असणार विशेष... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; यंदाची महाशिवरात्र असणार विशेष...

तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; यंदाची महाशिवरात्र असणार विशेष...

मुंबई - या वर्षी २१ फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. महादेवाचे भक्त यादिवशी निरनिराळ्या प्रकारे शंकराची पूजा करत असतात. मात्र यंदाची महाशिवरात्र खास असणार आहे. कारण यावर्षी महाशिवरात्रीला विशेष योग जुळून आला आहे. महाशिवरात्रीला यावर्षी 'शश योग' आला आहे. ज्योतिषींच्या म्हणण्यानुसार हा योग तब्बल ५९ वर्षानंतर आला आहे. त्यामुळे भक्तांसाठी ही विशेष पर्वणी असणार आहे. याआधी हा योग १९६१ ला आला होता.  

मोठी बातमी - मंत्र्यांच्या बैठकीआधी नवाब मलिक यांचं 'मोठं' वक्तव्य, म्हणालेत... 

काय आहे 'शश योग' ?

काही ज्योतिषींच्या म्हणण्यानुसार शश योग या महाशिवरात्रीच्या दिवशी असणार आहे. यादिवशी शनि आणि चंद्र हे मकर राशीत, गुरु धनू राशीत, बुध कुंभ राशीत तर शुक्र मीन राशीत असणार आहे. हा योग साधना करण्यासाठी आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशेष असतो असं जोतिष्यांचं म्हणणं आहे.  

या योगामध्ये विशेष दान-पुण्य करण्याचही महत्व आहे. त्यामुळे भक्तांना महादेवाची विशेष कृपा मिळवण्याची संधी असणार आहे असं देखील जोतिष्यांचं म्हणणं आहे. तसंच यादिवशी सर्वार्थ सिद्धी योगही असणार आहे. महादेवाचा रुद्राभिषेक या यादिवशी करून भक्तांना विशेष लाभ मिळवण्याची संधी असणार आहे.  

मोठी बातमी -  देवेंद्र फडणवीस पुन्हा आक्रमक; मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले चॅलेंज 

काय असेल शिवपूजेचा मुहूर्त:

सुर्योदयाच्या वेळी असलेल्या तिथीनुसार यावर्षी महाशिवरात्र २१ फेब्रुवारीला असणार आहे. शिवपूजेचा मुहूर्त २१ फेब्रुवारी संध्याकाळी ५.२० वाजता पासून २२ फेब्रुवारी संध्याकाळी ५.०२ वाजता पर्यंत असणार आहे.

कशी कराल शिवपूजा? 
 
महाशिवरात्रीला महादेवाचा अभिषेक दूध, पाणी, मध इत्यादि पदार्थांनी अभिषेक करणं शुभ मानलं जातं. महादेवाला बेलपत्र, धोत्र्याचे फूल आणि फळं हे अर्पण करावे. तसंच आरती करून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा, असं जोतिषी सांगतात.   

after 59 years this auspicious occasion will come on maha shivaratri read full story  


 

loading image
go to top