esakal | महाविकास आघाडीचं सरकार कसं चाललंय? उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडीचं सरकार कसं चाललंय? उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार तीन चाकीच आहे. रिक्षाच आहे ती गरीबांची. तीन चाकी तर तीन चाकी. पण स्टिअरिंग माझ्याच हाती आहे, पाठीमागे दोघे बसले आहेत, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

महाविकास आघाडीचं सरकार कसं चाललंय? उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. हे सरकार तीनचाकी सरकार असल्याचा आरोप विरोधक नेहमी करत असतात. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. 

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार तीन चाकीच आहे. रिक्षाच आहे ती गरीबांची. तीन चाकी तर तीन चाकी. पण स्टिअरिंग माझ्याच हाती आहे, पाठीमागे दोघे बसले आहेत. आमच्या सरकारचं मस्त चाललंय, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीकाकारांना उत्तर दिलं.

हेही वाचाः  राम मंदिर भूमिपूजनाला तुम्ही जाणार का?, मुख्यमंत्र्यांनी पहिल्यादांच दिलं 'हे' उत्तर

हे तीन चाकी सरकार आहे, पण ते गरीबांचं वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवड करायची झाली तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. मी मुख्यमंत्री झालो म्हणून मी बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन, असा समज कुणी करून घेऊ नये. माझं मत मी लोकांच्या सोबत असल्याने बुलेट ट्रेन नको असंच आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला आहे. 

या सरकारला तीन चाकं, तीन चाकं म्हणून म्हणून संबोधताय, पण ही तीन चाकं चालताहेत ना एका दिशेने मग तुमच्या पोटात का दुखतंय. केंद्रात किती चाकं आहेत. आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षाचं सरकार आहे. सांगा ना, मी जेव्हा गेल्या वेळी एनडीएच्या बैठकीला गेलो होतो तेव्हा तर 30-35 चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडीच होती, असा निशाणाही ठाकरेंनी भाजपवर साधला आहे. 

अधिक वाचाः  चीनला आणखी एक दणका, आता मुंबईतील 'मेगा प्रोजेक्ट' मिळणं झालं आणखी अवघड

महाआघाडी व्यवस्थित आहे. कुरकुर... कुरबूर असं काहीच नाही. एक गोष्ट स्वीकारली पाहिजे आणि ती मी नक्कीच स्वीकारतो की, गेल्या दोन-तीन महिन्यांत फेस टू फेस गाठीभेटी अवघड झाल्या आहेत. त्यामुळे फोनवरून किंवा व्हिडीओच्या माध्यमातून गाठीभेटी थोड्याफार सुरू असतात, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

How is government Mahavikas Aghadi going Uddhav Thackeray gave answer