राम मंदिर भूमिपूजनाला तुम्ही जाणार का?, मुख्यमंत्र्यांनी पहिल्यादांच दिलं 'हे' उत्तर

पूजा विचारे
Sunday, 26 July 2020

संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना राममंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला होईल अशी तारीख जाहीर झाली आहे. आपण त्या भूमिपूजनाला जाणार का?' असा प्रश्न विचारला.  यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिलं आहे.

मुंबईः शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राम मंदिर भूमिपूजनावरही पहिल्यांदाच उत्तरं दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. येत्या ५ ऑगस्टला हे भूमिपूजन होणार असून त्याची जय्यत तयारी अयोध्येत सुरु आहे. अशातच राज्यात यावरुन बरंच राजकारण रंगलं.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं. काही व्यक्तींना वाटतं राम मंदिर बांधून कोरोना जाईल,' असा टोला शरद पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे हेदेखील भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार असल्याचं बोललं जात आहे.  तसं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी आधीच केलं आहे. उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील, असं संजय राऊत यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. दरम्यान आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय.

संजय राऊतांनी मुलाखतीत मुख्यमंत्र्यांना राममंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला होईल अशी तारीख जाहीर झाली आहे. आपण त्या भूमिपूजनाला जाणार का?' असा प्रश्न विचारला.  यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, नुसतं हो किंवा नाही असं उत्तर द्यायचं तर मी व्यक्ती म्हणून काही उत्तर देऊ शकेन, पण आपण जसं म्हणालात की, राममंदिराच्या लढय़ात शिवसेनेच्या भूमिकेची इतिहासाने दखल घेतली आहे.

हेही वाचाः मोठी कारवाई! 'या' खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द,  राज्यातली पहिली कारवाई

यावर पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, मी मुख्यमंत्री नव्हतो त्याही वेळेला अयोध्येला जाऊन राममंदिरात गेलो. किंबहुना योगायोगावर माझी श्रद्धा आहे. माझी भावना हेच सांगते की, नोव्हेंबर 18 मध्ये पहिल्यांदा मी राममंदिरात गेलो होतो, आपण सोबत होतात. शिवनेरीवरची म्हणजे शिवजन्मभूमीची एक मूठ माती मी घेऊन गेलो, त्यानंतर या विषयाला खूप चालना मिळाली. त्याआधी हा विषय थंड पडला होता. कोणी काही विषयच काढत नव्हता. शिवसेनेने सुरुवात केली. उशीर लागत असेल तर कायदा बनवा, वटहुकूम काढा, वाट्टेल ते करा, पण राममंदिर बनवा असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

अधिक वाचाः रायगड जिल्ह्यात कोरोनाचा वेग वाढला! एकूण रुग्णसंख्येत राज्यात चौथ्या स्थानावर
 

संजय राऊतांनी आधीच दिलं होतं स्पष्टीकरण

उद्धव ठाकरे अयोध्येला  नक्की जातील. शिवसेनेचं या विषयाशी एक भावनिक, धार्मिक आणि राजकीय नातं जोडलेलं आहे. आज जे भव्य राम मंदिर आणि सोहळा होत आहे त्यातील अडथळे दूर करण्यासाठी शिवसेनेनं मोठं योगदान दिलं आहे. मी काल सांगितलं त्याप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजेच सरकारचे १०० दिवस झाल्यावरही गेले होते, असं संजय राऊत यांनी आधीच म्हटलं होतं.

Will you go Ram Mandir Bhumi Pujan cm uddhav Thackeray given answer


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will you go Ram Mandir Bhumi Pujan cm uddhav Thackeray given answer