Municipal Election
sakal
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ ः अंतिम क्षणापर्यंत ताणलेले जागावाटप, आयत्या वेळी दिले गेलेले एबी फॉर्म, त्यानंतर उडालेला गोंधळ, उमेदवारी अर्जांचा पाऊस आणि अर्ज बाद करण्यापासून ते माघारीपर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता खऱ्या अर्थाने पालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे. त्यात उद्या रविवार असल्याने आणि त्यानंतर अवघे १० दिवस हाती असल्याने प्रचाराला वेग येणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी पालिकेच्या रणसंग्रामात किती शिलेदार लढत देणार आहेत, त्याचा आढावा...