मजूरांच्या आयुष्याशी आणखी किती खेळणार? रेल्वेचे बेजबाबदार कारभार सुरूच...

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 25 मे 2020

ट्रेनच्या नव्या वेळेपर्यंत करायचे काय, योग्य प्रकारे निरोप का दिला जात नाही अशी विचारणा स्थलांतरीत करीत आहेत.

मुंबई ः लॉकडाऊनमुळे चांगलेच त्रासलेले स्थलांतरीतांना आपली ट्रेन निघणार आहे, त्यामुळे स्टेशनवर यावे अशी सूचना मिळते आणि स्टेशनवर पोहोचल्यावर काही वेळात ट्रेन रद्द झाल्याचे सांगण्यात येते आणि पुढची वेळ देण्यात येते. ट्रेनच्या नव्या वेळेपर्यंत करायचे काय, योग्य प्रकारे निरोप का दिला जात नाही अशी विचारणा स्थलांतरीत करीत आहेत. 

काय सांगता! आपली लालपरी पोहचली बांग्लादेशाच्या सीमेपर्यंत... वाचा बातमी

मुंबई तसेच उपनगरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकातून श्रमिक स्पेशल ट्रेन रवाना होत आहेत, पण आता त्या रद्द होण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक स्थलांतरीत संतप्त झाले आहेत. हे केवळ मीरा भाईंदरमध्ये घडले नाही, तर अनेक ठिकाणी घडत आहे. रविवारी दिंडोशी परिसरातील स्थलांतरीतांना सकाळी सहा वाजता पोलिसांनी जमा होण्यास सांगितले. अनेकांनी पहाटेपासूनच येण्यास सुरुवात केली. पण अचानक ट्रेन रद्द झाल्याचे सांगितले. ते स्थलांतरीत घरी पोहचून काही वेळ झाला नसेल तर परत ट्रेनबाबतचा संदेश आला. 

ट्रेन रद्द झाल्याचे सांगण्यात आलेल्या स्थलांतरीतांकडे पोलिसांनी दिलेले टोकनही होते. सकाळी सहा वाजता सुटणारी ट्रेन संध्याकाळी सहा वाजता सुटणार असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी आम्ही केवळ सूचनेचे पालन करीत असतो. ट्रेन रद्द झाल्याचे सांगितल्यावर आम्ही तेच सांगतो, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रधर्म! योगी अदित्यनाथ यांच्या ट्वीटनंतर राज ठाकरे यांचीही आक्रमक भूमिका

कल्याणहून गोरखपूरला जाणार असलेल्या ट्रेनबाबतही हेच घडले. सुरुवातीस शनिवारी बोलावण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळची घोषणा झाली. प्रत्यक्षात ट्रेन संध्याकाळी रवाना झाली. कल्याण, ठाण्याहून निघणाऱ्या ट्रेनबाबतच कायम प्रश्न कसा होतो, अशी विचारणा काही स्थलांतरीतांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How much more will you play with the lives of the workers? Irresponsible management of railways continues ...