esakal | काय सांगता! आपली लालपरी पोहचली बांग्लादेशाच्या सीमेपर्यंत... वाचा बातमी

बोलून बातमी शोधा

काय सांगता! आपली लालपरी पोहचली बांग्लादेशाच्या सीमेपर्यंत... वाचा बातमी

स्थलांतरीत कामगार केवळ श्रमिक स्पेशलने रवाना होत नाहीत, तर त्यांच्यातील काही जण राज्य परिवहन मंडळाचीही मदत घेत आहेत. त्यामुळे आरक्षित केलेल्या बस अनेक राज्यात जात आहेत. याच मोहीमेअंतर्गत एक बस थेट भारत - बांगलादेश सीमेपर्यंत गेली.

काय सांगता! आपली लालपरी पोहचली बांग्लादेशाच्या सीमेपर्यंत... वाचा बातमी
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई ः स्थलांतरीत कामगार केवळ श्रमिक स्पेशलने रवाना होत नाहीत, तर त्यांच्यातील काही जण राज्य परिवहन मंडळाचीही मदत घेत आहेत. त्यामुळे आरक्षित केलेल्या बस अनेक राज्यात जात आहेत. याच मोहीमेअंतर्गत एक बस थेट भारत - बांगलादेश सीमेपर्यंत गेली.

रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि संजय राऊतांमध्ये 'ट्वीट वार'! वाचा बातमी...

साताऱ्याहून निघालेली ही बस एकंदर 4 हजार 600 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या बसने 24 स्थलांतरीतांना पश्चिम बंगालमधील नादिया येथे सोडले. एवढ्या दूर अंतरापर्यंत प्रवास केलेली ही पहिली बस ठरली आहे. पश्चिम बंगालमध्ये जाण्यासाठी या 1 लाख 93 हजार 925 रुपये आकारण्यात आले. साताऱ्याहून 15 मे रोजी पहिली बस बांगलादेश सीमेपर्यंत रवाना झाली होती. आता दुसरी बसही पश्चिम बंगालमधील मालदासाठी रवाना झाली आहे. 
राज्य परिवहनने 11 दिवसात 15 हजारहून जास्त बसमधून 2 लाखाहून जास्त स्थलांतरीतांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले आहे. 
राज्य परिवहनच्या साताऱ्याहून पश्चिम बंगालकडे गेलेल्या पहिल्या बसने स्थलांतरीतांना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी सोडले आहे. या मार्गात कोणतेही प्रश्न आले नाहीत. आम्ही या मार्गासाठी दोन चालकांची नियुक्ती केली होती. त्यांनी आळीपाळीने आपले काम केले. 

VIDEO! मुंबईतील पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी फायर ब्रिगेडनं केला असा सराव

महाराष्ट्रातूनच पुदुचेरी, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा येथे जाण्यासाठी आरक्षण करण्यात आले होते. मात्र पश्चिम बंगालचा टप्पा ऐतिहासिक ठरला आहे. अर्थातच या प्रवासाच्यावेळी वाहकांच्या पाठीमागच्या भागात प्लॅस्टीकचे जाड कापड लावण्यात येते. त्याचबरोबर वाहकांना मास्क तसेच सॅनिटायझर पुरवण्यात आले आहेत.