देणगी कुठे द्यावी हे कसं ठरवायचं ?

योग्य ठिकाणी देणगी कशी पोहचवावी? देणगी देण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी ? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ
Donation NGO
Donation NGOsakal

गोरगरीब व्यक्तींना किंवा आर्थिकदृष्ट्या मागास घरातील मुलांना मदत आणि देणगी दिल्याने आपल्यापैकी प्रत्येकाला छान वाटतं. वाटलंच पाहिजे. पण आपल्याला प्रश्न पडतो की ही मदत कोणाला करावी? सत्पात्री दान करावं म्हणतात. मग हे सत्पात्री दान कस करावं? देणगी देण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी याच्या टिप्स आपण आज पाहणार आहोत.

देणगी कुठे द्यावी हे कसं ठरवायचं ?

१.ज्या समस्येसाठी तुम्हाला मदत करायची आहे त्याचा शोध घ्या

आपल्याला अंदाज देखील नाही अशा विविध समस्यांवर काम करणारे अनेक एनजीओ सध्या भारतात आहेत. देणगी देण्यापूर्वी ज्या कामासाठी तुम्हाला मदत करण्याची उत्कट इच्छा आहे ते शोधा. तुम्ही त्या कार्याबद्दल जागरूक असल्यामुळे योग्य ठिकाणी देणगी पोहचवू शकाल.

२. देणगी देण्यापूर्वी एनजीओ अधिकृत आहे का हे तपासून पहा

देणगी देण्यापूर्वी सर्वप्रथम एनजीओ नोंदणीकृत आहे का हे तपासा. म्हणजे जर ती एनजीओ भारतात काम करत असेल तर त्यांच्याकडे १२ A आणि 80 G ही प्रमाणपत्रे आहेत का याची खात्री करा. गुगल व इतर सोशल मीडिया वेबसाईटवर या एनजीओ बद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या बद्दल काही तक्रारी आहेत का याचा शोध घ्या. याच सोबत तुम्ही गाईडस्टार, चॅरिटी नेव्हीगेटर,चॅरिटी वॉच येथे त्या एनजीओला देण्यात आलेले रेटिंग्ज देखील तपासू शकता.

Donation NGO
नागपूर विभागात वाढला अवयव दानाचा टक्का

३. पारदर्शकतेच्या पातळीच निरीक्षण करा

एनजीओ आपल्या वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून जनतेशी आणि देणगीदारांशी संवाद साधत असतात. जर तुम्हाला एखाद्या एनजीओ बद्दल माहिती शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत असेल तर शंका घेण्यास जागा आहे. विश्वसार्ह एनजीओ आपण काय करतो, येथे कोण काम करतात, कस काम चालतं,निधी कुठून येतो हे सक्रियपणे जाहीर करत असतात.

४. एनजीओ च्या कार्यक्रमाचा समाजावर सकारात्मक परिणाम होतो आहे का हे तपासा

आपले योगदान देण्यापूर्वी, एनजीओची उद्दिष्टे, उपलब्धी आणि आव्हाने जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी बोला. अशा चर्चांमुळे एनजीओ सध्याचं कार्य भविष्यातील योजना, समाजावर होणारा परिणाम याबद्दल अंदाज येईल. अशी चर्चा करण्यास इच्छुक नसलेले किंवा असमर्थ असलेले एनजीओ तुमच्या मदतीस पात्र नसतील.

५. देणगी देण्यापूर्वी कोणत्याही अटी घालू नका.

तुम्ही सर्व गोष्टी तपासून देणगी देत आहात त्यामुळे त्या एनजीओ संस्थेला ही देणगी कुठे व कशी खर्च करावी याच स्वातंत्र्य असलं पाहिजे. तुमचे हस्तक्षेप नसतील तर ती संस्था त्यांच्या बदलत्या गरजेनुसार लवचिकपणे हा निधी वापरू शकेल. आपल्याला किती देणगी द्यायची आहे याचे बजेट बनवा. वर्षभरात देणगी देण्याचे आणि त्यात अंतर ठेवण्याचे कर फायदे जाणून घेतल्याने तुमची एकूण देणगी देण्याची क्षमता वाढू शकते.

६. आपल्या देणगीचा मागोवा घ्या

तुम्ही ज्या एनजीओला देणगी देत आहात त्या निधीचा उपयोग कसा केला जात आहे याचा सहा महिने ते वर्षभरापर्यंत मागोवा घ्या. याचा अर्थ असा नव्हे की अगदी तपशीलवार खर्च तपासला पाहिजे. फक्त ती संस्था तुम्ही दिलेल्या निधीचा योग्य वापर करण्या बद्दल किती जागरूक आहे हे तपासण्यासाठी प्रोग्रेस रिपोर्ट पाहिले पाहिजे. एकदा तुम्हाला ही एनजीओ आपल्या कार्यातून योग्य प्रभाव पाडत आहे याची खात्री पटली की मग त्यांच्या कार्याला दीर्घ कालावधीसाठी पाठिंबा देण्याचे वचनबद्ध राहू शकता. केवळ दीर्घकालीन, वचनबद्ध रित्या योगदान देणारे असतील तरच चॅरिटी यशस्वी होऊ शकते!

Donation NGO
धर्मादाय ट्रस्टला देणगीवर भरावा लागणार जीएसटी

सारांश :

जे इतरांना पैसे दान करतात ते अधिक समाधानी असतात असं एक निरीक्षण आहे. तुम्ही किती रक्कम देऊ शकता हे महत्त्वाचे नाही, तुम्हाला कदाचित जास्त देणगी देऊन जास्तीजास्त आनंदाचा अनुभव येईल परंतु तुमच्या योगदानाचा मागोवा घेणे आणि तुम्ही समर्थन करत असलेल्या कारणाविषयी खात्री बाळगण्यासाठी NGO कडे पाठपुरावा करत राहाणे महत्त्वाचे आहे.

प्रत्येकाचे ज्या कार्यासाठी देणगी द्यायची याचे प्राधान्यक्रम ठरलेले आहेत. मात्र नैसर्गिक आपत्ती व त्याच्या परिणामांचं काय ? दरवर्षी लाखो भारतीयांच्या जगण्यावर या नैसर्गिक आपत्तींचा परिणाम होत असतो. देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवगेळ्या हवामानाच्या स्थितीमुळे मानवतावादी संकटे आणखीनच जटिल बनत चालली आहेत. अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी, आपत्ती व्यवस्थापनात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी सकाळ रिलीफ फंडाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हाला समाजात बदल घडवायचा असेल, तर तुम्ही थेट सकाळ रिलीफ फंडाला देणगी देऊ शकता.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 9881099908 या नंबरवर अथवा support@sakalrelieffund.com इथे ईमेल द्वारे संपर्क करू शकता. थेट ऑनलाईन डोनेशन देखील करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com