Mumbai News: ‘एचपी’कडून ‘एआय’आधारित गेमिंग लॅपटॉप लॉन्च;

Mumbai News: ‘एचपी’कडून ‘एआय’आधारित गेमिंग लॅपटॉप लॉन्च;
Updated on

Mumbai News: ‘एचपी’ने एआय तंत्रज्ञान (कृत्रिम बुद्धिमता) असलेल्या नव्या लॅपटॉपची रेंज बाजारात आणली आहे. गेमर्स आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी अतिशय उपयुक्त असा हा लॅपटॉप असेल. या रेंजमध्ये ओमेन ट्रान्सेंड १४ आणि एचपी Envy x३६० १४ चा समावेश आहे. गेमिंगचा आणि कंटेंट क्रिएशनचा अनुभव आणखी सुकर करण्यासाठी यामध्ये इंटेलचे अल्ट्रा प्रोसेसर्स देण्यात आल्याची माहिती कंपनीने आज वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या कार्यक्रमात दिली.

Mumbai News: ‘एचपी’कडून ‘एआय’आधारित गेमिंग लॅपटॉप लॉन्च;
Mumbai News: लॉकेटमध्ये QR कोडमुळे पालकांशी झाला थेट संपर्क.. हरवलेला दिव्यांग मुलगा परतला 6 तासात घरी; नेमकं काय घडलं?

एआय तंत्रज्ञानाचा वापर जे युजर्स गेमिंग आणि कंटेंट क्रिएशनसाठी करतात त्यांच्यासाठी या लॅपटॉपची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातच गेमिंग आणि उत्तम ग्राफिक्स असल्यामुळे ‘एआय’ला आणखी बळ मिळते. ओमेन ट्रान्सेंड १४ मध्ये असलेल्या इंटेल प्रोसेसर्समुळे गेमर्स नवीन गेम्स आणि काही क्लिष्ट कामे अगदी सहज करू शकतात. ओमेम ट्रान्सेंड १४ इंटेल आणि एनवीडिया प्रोसेसर्समुळे लोकल एआय आणि बिल्ट इन एआय अशी दोन्ही वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. ओटर.एआयमुळे मीटिंग किंवा क्लासेसच्या वेळी ट्रान्सक्रिप्शन किंवा कॅप्शन्स देण्याचे काम त्याचवेळी होऊ शकते. एआय आधारभूत नोट्स काढणे, एखादा कार्यक्रम रेकॉर्ड करणे ही कामेसुद्धा सहज होऊ शकतात. जगातला सगळ्यात थंड १४ इंच गेमिंग लॅपटॉप- ओमेन ट्रान्सेंडच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी एक कुलिंग सिस्टीम आहे. त्यासाठी इंटेल कंपनीची मदत घेण्यात आली आहे. चेसिस वेपर चेंबरचा वापर करून हवा शोषून घेते आणि मागच्या बाजूने गरम हवा तयार करण्यासाठी दाब असलेला विशिष्ट झोन तयार करते. त्यामुळे हा १४ इंची गेमिंग लॅपटॉप सगळ्यात थंड लॅपटॉप आहे.

Mumbai News: ‘एचपी’कडून ‘एआय’आधारित गेमिंग लॅपटॉप लॉन्च;
Mumbai News: लॉकेटमध्ये QR कोडमुळे पालकांशी झाला थेट संपर्क.. हरवलेला दिव्यांग मुलगा परतला 6 तासात घरी; नेमकं काय घडलं?

एचपी Envy x३६० १४-- एआय आधारभूत असलेला युजर्सचा साथीदार

एआय आधारभूत कंटेंट क्रिएशन Envy १४ या नवीन लॅपटॉपमध्ये इंटेल प्रोसेसर्स देण्यात आला आहे. त्यामुळे अडोब फोटोशॉप वापरणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. या लॅपटॉपमध्ये न्यूरल प्रोसेसिंग युनिट असल्यामुळे बॅटरी ऑप्टिमायझेशन ६५ टक्क्याने वाढणार आहे. त्यामुळे उत्पादकता आणि कंटेंट क्रिएशनमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. Envy x३६० १४ या लॅपटॉपमध्ये मायक्रोसॉफ्ट को-पायलट बटन असलेला पहिला लॅपटॉप आहे. त्यामुळे असिस्टेड सर्च, कंटेंट जनरेशन आणि यासारखे अनेक एआय आधारभूत फीचर्स युजर्सला मिळतील. ‘एआय’मुळे उत्तम ऑडिओ आणि व्हीडिओ फीचर्स- एचपी Envy x३६० १४ या लॅपटॉपमध्ये विंडोज स्टुडिओ इफेक्ट असल्यामुळे व्हिडिओचा दर्जा वाढेल. यात एनपीयूचाही समावेश असल्यामुळे ऑटोमॅटिक झुमिंग, क्रॉपिंग हे विंडोज स्टु हे विंडोज स्टुडिओ चे फीचर्स आहेत. यामुळे व्हिडिओ कॉल्स दरम्यान आय कॉन्टॅक्ट नीट होऊ शकतो तसेच बॅकग्राऊंड ब्लर होतो आणि एआय नाईस ही सुविधासुद्धा उपलब्ध आहे. एआय आधारभूत प्रायव्हसी फिचर्समुळे तुम्ही स्क्रीन समोरून उठल्यावर स्क्रीन आपोआप लॉक होते आणि कोणी मागे उभा असेल तर स्क्रीनचा लाईट आपोआप डीम होतो.

Mumbai News: ‘एचपी’कडून ‘एआय’आधारित गेमिंग लॅपटॉप लॉन्च;
Mumbai High Court: शहीदाच्या विधवेला लाभ देणे शक्य नाही, शिंदे सरकारचा अजब युक्तिवाद; हायकोर्टाने फटकारले

उपलब्धता आणि किंमत

- एचपी ओमेन ट्रान्सेंड १४ हा एचपीच्या सर्व स्टोअर्समध्ये आणि एचपी ऑनलाईन स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत १,७४,९९९ पासून सुरू होते आणि तो सिरॅमिक व्हाईट आणि शॅडो ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे.

- एचपी Envy x३६० १४ हा सुद्धा एचपी स्टोअर्स आणि एचपी च्या ऑनलाईन स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत ९९,९९९ पासून सुरू होते. तो मेटॉरिक सिल्व्हर आणि ॲटमॉस्फरिक ब्ल्यू या रंगात उपलब्ध आहे

ग्राहकांना उत्तमोत्तम अनुभव मिळावेत, याबद्दल एचपीमध्ये आम्ही कायमच आग्रही असतो. ओमेन ट्रान्सेंड १४ आणि एचपी Envy x३६० १४ या दोन्ही लॅपटॉपमध्ये ‘एआय’च्या वापरामुळे उत्पादकता वाढेल. ओमेन ट्रान्सेंड १४ मुळे गेमिंगचा अनुभव आणखी चांगला होईल, पर्सन्लाईज्ड होईल. एआय असल्यामुळे हे शक्य झाले आहे. तसेच एआय आधारभूत ऑडिओ आणि व्हीडिओ असल्यामुळे एचपी Envy x३६० १४ यामुळे कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रात क्रांती येईल आणि लोकांची सर्जनशीलता आणखी वाढीस लागेल.

- विनित गेहलानी, वरिष्ठ संचालक, कन्झ्युमर सेल्स, एचपी इंडिया

‘एआय’ तंत्रज्ञानावर भर देऊन वापरकर्त्यांना आणखी समृद्ध करणे तसेच गेमिंग आणि काम हे सर्व अनुभव सुकर करणे हे एचपी कंपनीचे ध्येय आहे. एआय तंत्रज्ञान असलेले लॅपटॉप या व्यापक उद्योगक्षेत्रात आणताना आम्हाला अभिमान वाटत आहे. एआय आधारित पर्सन्लायझेशनमुळे आम्ही युजर एक्सिपिरियन्स आणखी समृद्ध करत आहोत. त्यामुळे तंत्रज्ञान वापराच्या क्षेत्रात क्रांती निर्माण होते आहे.

- इप्सिता दासगुप्ता, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एचपी इंडिया

...

Mumbai News: ‘एचपी’कडून ‘एआय’आधारित गेमिंग लॅपटॉप लॉन्च;
Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलिस गडचिरोलीत कर्तव्यावर; तीनशे अंमलदारांसह दहा अधिकारी जाणार

ठळक वैशिष्ट्ये

ओमेन ट्रान्सेंड १४ मध्ये एनवीडिया ग्राफिक्स कंपनीचं GeForceRTX ग्राफिक्स. एआय तंत्रज्ञान असलेल्या गेम्ससाठी उपयुक्त.

ओमेन ट्रान्सेंड हा एचपी कंपनीचा सर्वांत हलका गेमिंग लॅपटॉप आहे.

नवीन Envy x३६० १४ लॅपटॉपमध्ये डेडिकेटेड एनपीयू असल्यामुळे बॅटरी लाईफ ६५ टक्क्यांनी वाढतं,

या लॅपटॉपमध्ये मायक्रोसॉफ्ट को पायलट बटनमुळे एआय चे फीचर्स सक्रिय होतात.

Mumbai News: ‘एचपी’कडून ‘एआय’आधारित गेमिंग लॅपटॉप लॉन्च;
Mumbai Crime:प्रेयसीने प्रेम संबंध ठेवण्यास दिला नकार म्हणून प्रियकराने तिचे.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com