यंदाचा बारावी कला शाखेचा 'रेकाॅर्ड ब्रेक' निकाल! वाचा सविस्तर

मागील वर्षांच्या तुलनेत तब्बल 17.20 टक्के अधिकचा निकाल
hsc arts result
hsc arts resultsakal media

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल (hsc result) मोठ्या प्रमाणात लागलेला असताना यात पहिल्यांदांच कला शाखेच्या (arts faculty) निकालाने आत्तापर्यंतचे सर्व निकालाचे विक्रम मोडीत (record break result) काढले आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत (last year comparison) तब्बल 17.20 टक्के निकाल लागला अधिक लागला आहे. (hsc result-arts faculty-record break result-last year comparison-nss91)

मागील काही वर्षांच्या तुलनेत तब्बल यंदा बारावीच्या एकुण निकालात 8.97 टक्के वाढ झालेली असतानाच त्यात कला शाखेने यात मागील अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले असून या शाखेचा तब्बल 17.20 टक्के निकाल लागला आहे. त्या खालोखाल व्यवसाय अभ्यासक्रमांचा 12.73 टक्के तर वाणिज्य शाखेचा 8.64 आणि सर्वात कमी निकाल हा विज्ञान शाखेचा 2.52 टक्के इतका लागला आहे.

राज्यभरात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातून यंदा कला शाखेतून 3 लाख 76 हजार 412 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी सर्व विद्यार्थी मुल्यांकनाला पात्र ठरले होते. त्यातील केवळ 612 विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता तब्बल 3 लाख 57 हजार 91 हजार विद्यार्थी कला शाखेतून उत्तीर्ण झाले असून मागील अनेक वर्षांचे विक्रम यंदाच्या कला शाखेच्या निकालाने मोडीत काढले असून आहेत.

hsc arts result
पावसाळी आजारांमध्ये मलेरियाचा उद्रेक ! जून महिन्यात ३५७ रुग्ण

मुंबईतील कला शाखेचा असा आहे निकाल

मुंबई शिक्षण मंडळाच्या अंतर्गत नोदंणी केलेल्या एकुण 2 लाख 94 हजार 90 विद्यार्थ्यांपैकी केवळ कला शाखेसाठी 44 हजसा 5 विद्यार्थ्यांनी नोदंणी केली होती, त्यापैकी 43 हजार 912 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेचा एकुण निकाल 99.78 टक्के इतका लागला आहे.

असा आहे तुलनात्मक फरक

शाखा फेब्रु-मार्च-20 फेब्रु-मार्च-21 तुलनात्मक स्थिती

विज्ञान 96.93 टक्के 99.45 टक्के 2.52 टक्के जास्त

कला 82.63 टक्के 99.83 टक्के 17.20 टक्के जास्त

वाणिज्य 91.27 टक्के 99.91 टक्के 8.64 टक्के जास्त‍

व्यवसाय.. 86.07 98.80 12.73 टक्के जास्त

एकुण 90.66 99.63 8.97 टक्के जास्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com