
मुंबई : मागील तीन दिवसांपासून मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून आजपासून ते पाणी देखील पिणार नसल्याचे घोषित केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील अनेक ठिकाणाहून लाखो आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. यामुळे पोलिसांचा फौजफाटा मोठया प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सोमवारी मुंबईतील प्रशासकीय आणि वाहतूक केंद्रांमध्ये गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे.