मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण..

एकीकडे मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव नाही. दररोज हजारांच्यावर कोरोना रुग्ण मुंबईत आढळून येतायत

मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण..

मुंबई : एकीकडे मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव नाही. दररोज हजारांच्यावर कोरोना रुग्ण मुंबईत आढळून येतायत. अशात मुंबईतील रुग्णांमध्ये काही नवीन लक्षणं पाहायला मिळतायत. यावर आता मुंबईतील रुग्णालयांमधील डॉक्टर्स अभ्यास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिसू लागलेल्या या नवीन लक्षणांमुळे डॉक्टर्स देखील चांगलेच हैराण झालेत. इतर काही देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या म्युटेशनमध्ये बदल झाल्याचं निदर्शनास आलं होतं. त्याच धर्तीवर मुंबईत तसंच काही  झालंय का? कोरोना आणखी शक्तिशाली झालाय का ? असे प्रश्न आता निर्माण होण्यास वाव आहे.  

मोठी बातमी धक्कादायक! राज ठाकरेंच्या घरात कोरोनाची एन्ट्री

मुंबईत जी नवीन लक्षणं आढलीयेत त्यामध्ये धडधाकट मात्र करोना असलेल्या रुग्णामध्ये आणि त्यातही डायबिटीस नसलेल्या रुग्णांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण अचानक अनियंत्रितपणे वाढल्याचं आढळून आलंय. यामुळे कोरोना संसर्गाची गुंतागुंत वाढताना पाहायला मिळतेय. रुग्णांसाठी अचानक वाढणारी शुगर घातक ठरू शकते असं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. एकंदरच ही नवीन लक्षणं आढळून आल्याने रुग्णालयांमधील डॉक्टर्स हैराण झालेत. दरम्यान कोरोना रुग्णांमध्ये नक्की असं का होतंय, आढळणारी नवीन लक्षणं कशामुळे दिसतायत? याबद्दल KEM मधील डॉक्टरांचं पथक आता तपास करतंय. लवकरच याची माहिती मिळेल असं डॉक्टर्स म्हणतायत. 

मोठी बातमी  - कौतुकास्पद! मुंबईतील आदिवासी पाडे ग्रीन झोनमध्येच, उत्तम नियोजनाचा सकारात्मक परिणाम

एका ३५ वर्षीय कोरोना रुग्णाला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं. ताप किंवा काही इन्फेक्शन झाल्यास शरीरातील शुगरचं प्रमाण वाढतं असतं असं डॉक्टर्स सांगतात. या रुग्णाला दवाखान्यात दाखल करतेवेळी शुगर ही ३३० होती. मात्र या रुग्णाला कोरोना डिटेक्ट झाल्यानंतर उपचार करतानाची शुगर ही ५०० वर गेल्याचं आढळून आलं. या रुग्णला दहा दिवस १५० ते २०० युनिट्स इन्सुलिन दिल्यानंतर शुगर कंट्रोलमध्ये आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.\

INSIDE STORY : बेवारस कारमुळे तपास पोहोचला मेमन कुटुंबियांपर्यंत, युसुफच्या घराचा वापर दहशवादी कृत्यासाठी

भारतात मोठ्या प्रमाणात डायबिटीस पेशंट्स आहेत. अशात सध्या रुग्णालयांमध्ये साधारणतः २२ ते ५५ वर्षांचे रुग्ण येण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या वयोगटातील रुग्णांमध्ये अचानक शुगर वाढणं नक्कीच विचार करायला लावणारी बाब आहे. हा प्रकार अलिकडेच सुरू झाल्याचं फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितलंय. यावर डॉक्टर्स तपास करत असून लवकरच असं कशामुळे होतंय हे समोर येईल असंही डॉक्टर म्हणतायत.   

new symptoms are observed in mumbai corona patients doctors are also astonished

loading image
go to top