मुंबईत कोरोना संक्रमणाची बाधा आणि प्रसाराचीही होणार उकल, आणखी १० हजार व्यक्तींवर होणार 'हे' सर्वेक्षण..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

Covid19 चा संसर्ग, संक्रमणाचा कल समजून घेण्यासाठी मुंबई पालिकेकडून शहरात व्यापक प्रमाणावर सेरो सर्वेक्षणाची सुरवात करण्यात आली आहे

मुंबई : Covid19 चा संसर्ग, संक्रमणाचा कल समजून घेण्यासाठी मुंबई पालिकेकडून शहरात व्यापक प्रमाणावर सेरो सर्वेक्षणाची सुरवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील झोपडपट्टी विभागातील 500 व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात झोपाडपट्ट्या वगळून इतर भागातील 10 हजार व्यक्तींवर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून संक्रमणाची बाधा तसेच संक्रमणाचा प्रसार लोकांमध्ये कसा झाला याबद्दलची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

भारतीय वैद्यैकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी सर्व राज्यांना रक्त नमुने घेऊन सादर करायचे आहेत. म्हणजेच आपापल्या राज्यात संक्षिप्तपणे सेरो सर्वेक्षण राबवून कोविड 19 विषाणू सामुदायिक संसर्ग पडताळण्यास सांगितलं आहे.  ICMR  च्या  सुचनेण्यासार मुंबईत 500 व्यक्तींचे सेरो सर्वेक्षण यापूर्वीच करण्यात आले होते. आता महापालिका, नीती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, यांसह इतर संस्थांच्या सहकार्याने एम/पश्चिम, एफ/उत्तर आणि आर/उत्तर या तीन विभागांमध्ये सेरो सर्वेक्षण करण्याचे नियोजन केले आहे. 

मोठी बातमी - मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण...

या सर्वेक्षणाचा उद्देश हा नॉवेल कोरोना व्हायरसच संक्रमणाचे प्राबल्य समजून घेणे हा आहे. त्यातून सर्वसाधारण लोकसंख्येमध्ये झालेल्या संक्रमणाचा भौगोलिक फैलाव समजून घेण्यास मदत होण्यासह या संक्रमणातून उद्भवणारे सामाजिक आणि लोकसंख्याशास्त्रीय धोके निश्चित करण्यास देखील मदत होणार आहे. दरम्यान हे मूलभूत स्वरूपाचे सर्वेक्षण असून यानतंर सर्वेक्षणाच्या आणखी फेऱ्यादेखील होणार आहे. याद्वारा संक्रमणाचा माग निश्चित करता येईल. यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या प्राप्त करण्यात आल्या आहेत. 

सर्वेक्षणाची पद्धत: 

 • हे सर्वेक्षण 12 वर्षे वयोगटावरील व्यक्तींमध्ये करण्यात येणार आहे.
 • झोपडपट्टी आणि झोपडपट्टी वगळता इतर भागातील मिळून 10 नमुने रँडम पद्धतीने संकलित करण्यात येणार आहेत.
 • आरोग्य अधिकारी आणि बिगर शासकीय संस्था यांची पथकं स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने निवडक घरांना भेटी देऊन सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्यांची नावे निश्चित करतील. 
 • त्यानंतर ही पथके संबंधित नागरिकांच्या घरी भेटी देऊन मूलभूत माहिती संकलित करतील. 
 • झोपडपट्टी वगळता इतर भागांमध्ये गृहनिर्माण संस्था देखील रँडम पद्धतीने निवडण्यात येतील.
 • सदर निवडक सोसायटीमधून मोजक्या व्यक्तींची नोंदणी करण्यात येईल. 
 • निवडलेल्या नागरिकांची स्वेच्छा संमती प्राप्त करून घेण्यात येईल आणि त्यानंतर सहभागी संबंधित नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्यात येतील. 

मोठी बातमी - धक्कादायक! राज ठाकरेंच्या घरात कोरोनाची एन्ट्री

 • कस्तुरबा सूक्ष्मजीव निदान वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये तसेच फरीदाबादमधील ट्रान्सलेशन स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिक संस्थान यांच्याकडे हे नमुने पाठवून अँटीबॉडीज निदान करण्यात येईल.
 • अँटीबॉडीजचे निदान होणे हे कोविड 19 संसर्गाचे लक्षण आहे. 
 • सेरो सर्वेक्षण होत असलेल्या विभागांंमध्ये आरोग्य कर्मचारी तसेच आघाडीच्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सर्वेक्षण घेण्यात येईल.
 • या सर्वेक्षणातून संक्रमणाची बाधा होणे, संक्रमणाचा प्रसार लोकांमध्ये कसा झाला याबद्दलची माहिती सार्वजनिक आरोग्याच्या धोरणात्मक निर्णयांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. 

siro survey will be done on ten thousand people of mumbai to detect covid spread


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: siro survey will be done on ten thousand people of mumbai to detect covid spread