पोलिस कोठडीतील मृत्यूची मानवाधिकार आयोगाकडून दखल 

पोलिस कोठडीतील मृत्यूची मानवाधिकार आयोगाकडून दखल 


मुंबई, ता. २ : वडाळा टीटी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या मृत्यूची दखल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी १४ नोव्हेंबरपर्यंत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देशही आयोगाने गुन्हे शाखेला दिले. हा तपास सीआयडीकडे सोपवण्याची मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे. 

वडाळा टीटी पोलिसांच्या कोठडीत विजय सिंह या तरुणाचा २७ ऑक्‍टोबरला मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला एका प्रकरणात ताब्यात घेतले होते. पोलिस ठाण्यात त्याने पाणी मागितले; मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले. छातीत दुखत असल्याचे सांगूनही त्याला रुग्णालयात नेले नाही. त्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले असून गुन्हे शाखा तपास करत आहे.

या प्रकरणी १४ नोव्हेंबरला सुनावणी होणार असून, पोलिस आणि तक्रारदार हे दोन्ही पक्ष बाजू मांडणार आहेत. मानवाधिकार आयोगाला अध्यक्ष नसल्याने उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींसमोर सुनावणी होईल. या प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे दिल्यास मृत विजय सिंहला न्याय मिळेल, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी पोलिस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com