इक्‍बाल मिर्चीचा साथीदार हुमायून मर्चंट अटकेत

इक्बाल मिर्ची
इक्बाल मिर्ची

मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक मोहम्मद मेमन ऊर्फ इक्‍बाल मिर्ची याच्या बेकायदा मालमत्ता प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हुमायून मर्चंट याला अटक केली. इक्‍बालच्या मुंबईतील मालमत्तांचे व्यवहार व देखभाल करत असल्याचा आरोप मर्चंटवर आहे. दरम्यान, दिवसभरातील दुसरी कारवाई करत ईडीने रिंकू देशपांडे हिलाही अटक केली. ती बनावट केवायसी आणि भाडेकरू प्रमाणपत्र द्यायची, असे तपासात समोर आले आहे.

मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील एक प्रमुख आरोपी असलेल्या इक्‍बालला 1994 मध्ये तडीपार करण्यात आले होते. दाऊद इब्राहिम टोळीचा अमली पदार्थांचा व्यवसाय सांभाळणाऱ्या इक्‍बालला पकडण्यासाठी इंटरपोलने नोटीस जारी केली होती. अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात 1988 पासून मुंबई पोलिसांना हव्या असलेल्या इक्‍बालने 1995 मध्ये भारतातून पलायन केले होते. यापूूर्वी या प्रकरणात शुक्रवारी ईडीने पटेल यांची चौकशी केली होती. 12 तासांहून अधिक वेळ ही चौकशी चालली.

....

कोण आहे मर्चंट?
हुमायून मर्चंट हा इक्‍बाल मिर्चीचा बालमित्र होता. गुन्हेगारी जगतात तो इक्‍बालचा अतिशय जवळचा सहकारी म्हणून ओळखला जात होता. त्यामुळेच इक्‍बालच्या मुंबईतील मालमत्तांची देखभाल करण्याची आणि व्यवहाराची जबाबदारी त्याच्यावर होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com