लॉकडाऊनमुळे उपासमार...गावरान महिलांचा कुटुंबाला 'असाही' हातभार! 

नरेश जाधव
रविवार, 17 मे 2020

लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील जनजीवन देखील ठप्प झाले आहे. लॉकडाऊनमुळे कंपन्या, दुकाने व इतर छोटे व्यवसाय बंद असल्याने घरातील कामधंदे करणाऱ्या कर्त्या पुरुषांना वेतन मिळत नसल्याने उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ग्रामीण भागातील महिला पापड, कुरडई, भातवड्या अशी उन्हाळकामे करून आर्थिक बाजू सांभाळताना दिसत आहेत. 

खर्डी (ठाणे) : लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील जनजीवन देखील ठप्प झाले आहे. लॉकडाऊनमुळे कंपन्या, दुकाने व इतर छोटे व्यवसाय बंद असल्याने घरातील कामधंदे करणाऱ्या कर्त्या पुरुषांना वेतन मिळत नसल्याने उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ग्रामीण भागातील महिला पापड, कुरडई, भातवड्या अशी उन्हाळकामे करून आर्थिक बाजू सांभाळताना दिसत आहेत. 

क्लिक करा : मातीला आकार देणारा कुंभार समाज आर्थिक संकटात

आर्थिक मंदी निर्माण झाली तर कुटुंबाची उपासमार होऊ नये यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी घरगुती वाळवणीचे पदार्थ यावर्षी जास्तच तयार करून त्याची बाजारात किंवा ऑर्डर घेऊन विक्री सुरू केली आहे. घरगुती स्वस्तात बनणाऱ्या पदार्थांचा व्यवसाय ग्रामीण भागातील काही बचत गट करीत आहेत. या घरगुती पदार्थांना शहरात जास्त मागणी असल्याने अनेक कुटुंबांना यामुळे सध्या रोजगार उपलब्ध झाला आहे. 

पुढचे काही महिने भाजीपाला, किराणा, रेशनिंगचा वापरही जपून करावा लागणार याची कल्पना आली असल्याने, ग्रामीण भागातील महिलांनी तांदूळ, उडिद, नाचणी यांपासून खारवड्या, मिरगुंड्या, पापड, कुरडई, भातवड्या, भरलेल्या मिरच्या, कारली, भेंडी असे वाळवणीचे पदार्थ तयार करण्यावर भर दिला आहे.

क्लिक करा : कोरोनासह ठाणे जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट गडद

महिला व काही बचत गट आर्डरप्रमाणे वाळवण बनवून देत आहे. यात आंब्याचे लोणचे, सुख्या मिरच्या यासारखे टिकाऊ तसेच इतर पदार्थ बनवून त्यांची विक्री केली जात आहे. कोरोनाची दाहकता आणि भविष्यात उभे राहणारे भीषण संकट ओळखून ग्रामीण महिलांनी भविष्यासाठी केलेली तजवीज सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

घरगुती पदार्थांचे दर प्रतिकिलो
मिरगुंडी            300
खारोडी             250
कुरडई             250 ते 400 
नागली/तांदूळ पापड   250 ते 300 

लॉकडाऊनमुळे लोकल ट्रेन बंद असल्याने ओळखीचे कर्मचारी यायचे बंद झाल्याने आम्ही वाळवणाची आर्डर घेऊनच पदार्थ बनवतो. वाळवण विक्रीमुळे आमच्या बचतगटातील महिलांना सध्या रोजगार उपलब्ध असून त्यामुळे घरखर्चाला हातभार लागत आहे. 
- ज्योती पतंगराव, 
अध्यक्ष, जागृती बचत गट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hunger due to lockdown ... contribution of rural women to their family!