मातीला आकार देणारा कुंभार समाज आर्थिक संकटात, फिरतं चाक रुतलं

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

सध्या देशभरात लागू असलेल्या टाळाबंदीमुळे सर्वच छोटे-मोठे उद्योगधंदे डबघाईला आले असून याचाच फटका मातीची भांडी तयार करणाऱ्या कुंभार समाजाला देखील बसला आहे.

टिटवाळा : सध्या देशभरात लागू असलेल्या टाळाबंदीमुळे सर्वच छोटे-मोठे उद्योगधंदे डबघाईला आले असून याचाच फटका मातीची भांडी तयार करणाऱ्या कुंभार समाजाला देखील बसला आहे. सर्व प्रकारचे दळणवळण व उद्योग बंद असल्याने तयार केलेली मातीची भांडी विक्री विना तशीच पडून आहेत. यामुळे हा समाज मोठ्या  आर्थिक संकटात पडला आहे, 

हे ही वाचा एका ट्विटमुळे रेल्वेनं रुग्णासाठी मुंबईहून घरपोच पाठवली 'ही' गोष्ट.. सोलापूरचा कर्करुग्ण गेला भारावून 

उन्हाळ्यात शहरी आणि ग्रामीण भागात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या मडक्याची विक्री देखील लॉकडाऊनमुळे  थांबली आहे. दरम्यान  फेब्रुवारी  महिन्यापासून कुंभार समाजातील कारागीर विविध   मातीची भांडी तसेच  माठ,  रांजन व चुली तयार करत असतात. मार्च महिन्यात विक्रीसाठी हा माल तयार असतो. मात्र यंदा मार्चपासून लॉकडाऊन लागू झाल्याने खरेदीसाठी ग्राहकच नसल्याने सर्व तयार माल घरीच पडून आहे. तसेच पावसाळा तोंडावर आला असून त्यापूर्वी या भांड्याची विक्री झाली नाही, तर वर्षभर केलेली मेहनत पाण्यात जाईल तसेच घर खर्च भागवायचा कसा? हा प्रश्न समाज बांधवांना सतावत आहे. 

मोठी बातमी : ठरलं तर! महाराष्ट्रात उद्यापासून लॉकडाऊन-४ सुरु होणार..वाचा काय असेल सुरु आणि काय बंद 

मुख्यमंत्र्यांना साकडे
कुभांर समाजाने विविध प्रकारची मातीची भांडी तयार करुन ठेवली असून विक्री बंद असल्याने ही भांडी घरीच पडून आहेत. या पार्श्वभूमींवर  अखिल भारतीय प्रजापती कुंभार महासंघ  सेलचे अध्यक्ष दत्ता कुंभार यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,  उपुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदन देवून मातीच्या भांड्यांची विक्री करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.

आधीच डबघाईस आलेल्या कुंभार व्यवसायाला कोरोनाचे ग्रहण लागल्याने माती कारागीरांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.

- राम कुंभार, कारागीर

Pottery society in financial crisis, There is no sale of earthenware


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pottery society in financial crisis, There is no sale of earthenware