कोरोनासह ठाणे जिल्ह्यावर पाणी टंचाईचं गडद संकट, टॅंकरने पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यावर कोरोनाचे संकट गडद होत असतांना, दुसरीकडे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील गावपाड्यांवर पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे.

ठाणे : दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यावर कोरोनाचे संकट गडद होत असतांना, दुसरीकडे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील गावपाड्यांवर पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. शहापूर तालुक्यातील 201 आणि मुरबाड तालुक्यातील 34 अशा 235 गावपाड्यांना 41 टँकरद्वरे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 

मोठी बातमी : ठरलं तर! महाराष्ट्रात उद्यापासून लॉकडाऊन-४ सुरु होणार..वाचा काय असेल सुरु आणि काय बंद 

जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात साधारणत: दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात पाणी टंचाईच्या समस्या भेडसावू लागतात. यंदा पावसाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात दमदार हजेरी लावली होती. तसेच शहापूर आणि मुरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, असे असतांना देखील फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच शहापूर तालुक्यात पाणी टंचाई आहे.

हे ही वाचाएका ट्विटमुळे रेल्वेनं रुग्णासाठी मुंबईहून घरपोच पाठवली 'ही' गोष्ट.. सोलापूरचा कर्करुग्ण गेला भारावून 

शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असून सध्याच्या घडीला तालुक्यातील 46 गावे आणि 155 पाडे अशा एकूण 201 गावपाड्यांना 34 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर, मुरबाड तालुक्यातील 11 गावे आणि 23 पाडे असा 34 गावपाड्यांना टँकरद्वरे पाणी पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

नक्की वाचा'बायको-मुलांसमोर दारू पिऊ कशी ?' घरपोच दारूचा पर्याय मिळाला मात्र  मद्यप्रेमींची घालमेल सुरू.. 

कोरोनाबरोबरच टंचाईचा प्रश्न बिकट
ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यात या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यावर कोरोनाचे संकट गडद होत असतांना, पाणी टंचाईची समस्यादेखील मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Crisis of water  in Thane district, water supply by tanker read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crisis of water in Thane district, water supply by tanker read full story