येऊरमधून शिकाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

मुंबई - ठाण्यातील येऊर परिसरातून वन अधिकाऱ्यांनी सुशांत भोवर या शिकाऱ्याला अटक केली. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना उजेडात आल्यानंतरही राष्ट्रीय उद्यानाचे अवैध प्रवेशद्वार बंद करण्यात वन विभाग दिरंगाई करीत असल्याने न्यायालयाचा अवमान होत असल्याची टीका पर्यावरणतज्ज्ञांनी केली आहे. वन अधिकाऱ्यांनी वणीचा पाडा येथून अटक केलेल्या सुशांत भोवर या कथित शिकाऱ्याला मंगळवारी (ता. 15) ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने वन्यजीवांसाठी जंगलात लावलेला कॅमेरा ट्रॅप चोरला होता. ही चोरी डिसेंबर 2018 मध्ये झाल्यानंतर काही दिवसांनी चित्रनगरीतील बिबट्या व सांबराच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले. या कॅमेऱ्यात पाठमोरा भोवर दिसला होता. त्याच्या शर्टावरील सुशांत नावावरून वन अधिकारी दोन आठवड्यांपासून शोध घेत होते.
Web Title: Hunter Arrested in Yeur Crime