रागाच्या भरात गळा आवळून पत्नीची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

गळ्यास ब्लॅंकेट आवळून तोंडावर उशी दाबून तिची हत्या केली.

भिवंडी - भिवंडी शहरातील श्रीरंग नगर परिसरात राहणाऱ्या अरविंद केशरवानी याचे आपल्या पत्नीशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. भांडणात राग अनावर झाल्याने अरविंदने पत्नी सपना हिच्या गळ्यास ब्लॅंकेट आवळून तोंडावर उशी दाबून तिची हत्या केली.

हेही वाचा - जवळचे भाडे नकोच

घटनेनंतरआरोपी फरार असून याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भिवंडीतील श्रीरंग नगर येथील कमला हॉटेलच्या मागील इमारतीत अरविंद व सपना हे दोघे राहत होते. रविवारी (ता. 23) संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. त्या वेळी संतप्त झालेल्या अरविंदने पत्नी सपनाच्या गळ्याभोवती ब्लॅंकेट आवळून व तोंडावर उशी दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला.

महत्त्वाची बातमी - मनसे आमदार राजू पाटलांचा सरकार गंभीर आरोप

या घटनेची माहिती रात्री उशिरा समजताच सपनाचे वडील राजेंद्रकुमार गुप्ता यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या पोलिस फरार आरोपी अरविंद याचा शोध घेत आहेत. 

web title : husband kills his wife in an angry mood


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband kills his wife in an angry mood