भिंतीवर लिहिली बायकोच्या प्रियकराची माहिती, पण त्या आधीच त्यानं तिला...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

मुंबई: मुंबईत दिवसेंदिवस हत्येच्या घटना वाढत चालल्या आहेत. हत्या करणारा व्यक्ती हत्या केल्यानंतर काय करेल काही सांगता येत नाही. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीनं पत्नीची हत्या केली. हत्येनंतर त्यानं पत्नीच्या प्रियकराबद्दल भिंतीवर लिहिलं आहे. 

मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस हत्येच्या घटना वाढत चालल्या आहेत. हत्या करणारा व्यक्ती हत्या केल्यानंतर काय करेल काही सांगता येत नाही. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीनं पत्नीची हत्या केली. हत्येनंतर त्यानं पत्नीच्या प्रियकराबद्दल भिंतीवर लिहिलं.  

सावधान ! महाराष्ट्रात एका दिवसात वाढलेत ११ कोरोना रुग्ण; अजूनही बाहेर पडत असाल तर आत्ताच थांबा

मीरा रोडच्या गीता नगर भागात राहणारा नासिर खान यानं त्याच्या २२ वर्षांच्या पत्नीची हत्या केली. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत या संशयातून त्यांना आपल्या आपल्या पत्नीची हत्या केली अशी माहिती मिळतेय. यावेळी या दाम्पत्याची ३ वर्षांची मुलगीही होती. नासिर खान यानं पत्नीची हत्या केल्यानंतर मुलीला आपल्या बहिणीकडे ठेवलं आणि पळ काढला. मात्र त्याआधी त्यांनी पत्नीच्या प्रियकराची माहिती भिंतीवर लिहून ठेवली. 

नासिर खान आणि त्याची पत्नी शमीम यांचा विवाह २०१६ ला झाला होता. ते दोघंही उत्तर प्रदेशमध्ये आपल्या मूळ गावात राहत होते. त्यानंतर त्यांना मुलगीही झाली. मात्र नासिर खान याला आपल्या पत्नीचे दीपक ठाकूर नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध आहेत अशी शंका होती. यावरून त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. 

हेही वाचा: बाजारपेठांचे शटरडाउन....  

काही दिवसांपूर्वी ते मुंबईच्या मीरा रोड इथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला आले होते. मात्र मुंबईत आल्यानंतरही आपल्या पत्नीचे दीपक ठाकूरशी संबंध आहेत असा संशय नासिर खान याला आला आणि त्यांना आपल्या पत्नीची हत्या केली. मात्र हत्येपूर्वी त्यानं आपल्या घराच्या भिंतीवर पत्नीच्या प्रियकराची माहिती लिहिली आहे आणि गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी नासिर खान याच्यावर हत्येचा  गुन्हा दाखल केला आहे.  

husband murdered his wife and wrote confession on wall read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband murdered his wife and wrote confession on wall read full story