esakal | बाजारपेठांचे शटर डाऊन
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गजबजलेल्या भागांत शुकशुकाट 

बाजारपेठांचे शटर डाऊन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी अनावश्‍यक गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील 50 टक्के दुकाने दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. दादर या मध्यवर्ती बाजारपेठेतील 610 दुकाने गुढीपाडव्यापर्यंत बंद राहतील. त्यामुळे दादरसह झवेरी बाजार, फॅशन स्ट्रीट, मनीष मार्केट, बोरा बाजार, चर्चगेट, गेटवे ऑफ इंडिया परिसरात शुक्रवारी शुकशुकाट होता.

गुढीपाडवाच्या बाजारपेठेवर कोरोनाची संक्रांत... 

गजबजलेल्या भागांतील दुकानांची यादी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत. या भागांतील दुकाने आळीपाळीने बंद ठेवण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली.

त्याने धावत्या लोकलमधून वृद्धास ढकललं! वाचा नेमकं काय झालं...

दादर पश्‍चिम येथील दुकानदारांच्या संघटनेने गुढीपाडव्यापर्यंत 900 पैकी 610 दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दादरमधील इतर ठिकाणीही दुकाने आळीपाळीने बंद ठेवण्यात येतील. फॅशन स्ट्रीट आणि इतर गजबजलेले बाजारही बंद ठेवले जाणार आहेत. 

२१ वर्षांनंतर त्याला झाली अटक; केलं होतं कृत्य...

दादर, माहीम, धारावी 
दादर : पूर्वेकडील न. चिं. केळकर मार्ग (पूर्व आणि पश्‍चिम दिशेने), डिसिल्वा मार्ग, छबिलदास मार्ग, एस. के. बोले मार्ग (उत्तर आणि दक्षिण दिशेने), सेनापती बापट मार्ग (कोहिनूर टेक, इन्स्टिट्यूट ते हॉकर्स प्लाझा), एम. सी. जावळे मार्ग ते भवानी शंकर मार्ग महापालिका शाळा, एम. जी. रानडे मार्ग. माहीम : टी. एस. कटारिया मार्ग (दक्षिण दिशेने गंगाविहार हॉटेल ते शोभा हॉटेल), एल. जे. मार्ग (दर्गा गल्ली). धारावी : 90 फूट मार्ग (पश्‍चिम दिशा), (60 फूट रस्ता ते संत रोहिदास मार्ग), आंध्र व्हॅली मार्ग (पूर्व आणि पश्‍चिम दिशेने), एम. जी. मार्ग (उत्तर आणि दक्षिण दिशेने). 

३१ मार्चपर्यंत महाराष्टातील ४ मोठी शहरं राहणार बंद-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

झवेरी बाजार 
झवेरी बाजार आणि एम. जे. कापड मार्केट चार दिवस बंद ठेवले जाणार आहेत. व्यावसायिकांच्या संघटनेने हे दोन्ही बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बंदच्या काळात बाजारातील साफसफाई आणि निर्जंतुकीकरणाचे काम केले जाईल, अशी माहिती व्यापारी संघटनेने दिली. 

मनसेनंही घेतला कोरोनाचा धस्का,गुढीपाडवा मेळावा केला रद्द

गेटवे, हुतात्मा चौक, फोर्ट 
हुतामा चौक, हॉर्निमन सर्कल, एम. जी. रोड, श्‍यामाप्रसाद मुखर्जी चौक, एसबीएस चौक, मनीष मार्केट, मुसाफिर खाना, लोकमान्य टिळक मार्ग, आनंदीलाल पोद्दार मार्ग, महर्षी कर्वे मार्ग, चर्चगेट, सीएसएमटी सबवे, बोराबाजार, डीएन रोड, चर्चगेट सबवे, सीएसएमटी सबवे, गेटवे ऑफ इंडिया

Shutter Down of the Market