"उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं" - अनुराग कश्यप

सुमित बागुल
Sunday, 20 September 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकांबद्दल माझी मतं वेगळी असू शकतात. मात्र उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. कंगनाने या सर्व प्रकारात उडी घेत कायम वादग्रस्त वक्तव्य केल्याने हे प्रकरण जास्त चर्चेत राहिलं. या सर्व वादादरम्यान कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीर अशीही केली. यानंतर हा वाद अधिक चिघळला, वाढला. कंगनाच्या या मतानंतर बॉलिवूड आणि समाजाच्या विविध स्तरांवरून प्रतिक्रिया आल्यात. कंगनाचं मत चुकीचं असल्याचं सर्वांचं म्हणणं ठरलं.

यामध्ये आता अनुराग कश्यप याने मुंबई आणि महाराष्ट्राबाबत आपलं मत मांडलं आहे. अनुराग कश्यप यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं असं म्हटलंय. एका मुलाखतीत दिग्दर्शक अनुराग कश्यप याने आपलं मत मांडलं आहे.

महत्त्वाची बातमी - उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा - निवडणूक आयोग

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकांबद्दल माझी मतं वेगळी असू शकतात. मात्र उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं. गेल्या काही काळात ज्या गोष्टी महाराष्ट्रात घडतायत त्यामुळे एक पक्ष म्हणून शिवसेनेबाबत माझं मत, शिवसेनेबाबतची माझ्या मनातील प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. हे सर्व उद्धव ठाकरेंमुळे घडलं. महाराष्ट्रात असताना मी माझी मतं खुलेपणाने मांडू शकतो, असंही अनुराग कश्यप म्हणालाय.      

सुशांत सिंह राजापूरच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. आता सुशांत प्रकरणी CBI तपास करतेय. यामध्ये रोज नवनवे मुद्दे समोर येतायत. सुशांतला न्याय मिळावा म्हणून कंगनाने सुशांतीची बाजू मांडण्यासाठी अनेक मुद्यांवर टिप्पणी केलीये. मात्र यामध्ये कंगना वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. नुकतंच कंगना आणि अनुरागमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचंही आपल्याला ठाऊक आहे. 

i feel safe in maharashtra because of chief minister uddhav thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: i feel safe in maharashtra because of chief minister uddhav thackeray