मराठा समाजाचं दु:ख शरद पवारांना सांगितलं - संभाजी राजे

मराठा समाजाची अस्वस्थततेची भावना पोहोचवली
sambhaji raje bhosle 1.jpg
sambhaji raje bhosle 1.jpg

मुंबई: "मराठा समाज (marath community) किती अस्वस्थ आहे, दु:खी आहे, ते मी पवार साहेबांना सांगितलं. मराठा समाजाची अस्वस्थततेची भावना मी पवारसाहेबांपर्यंत पोहोचवली" असे खासदार संभाजी राजे (sambhaji raje) शरद पवारांच्या (sharad pawar) भेटीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले. "सद्य स्थितीत पवारसाहेबांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचही मी त्यांना सांगितलं. पवारसाहेब, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, अजितदादा या सर्वांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे, ही सकल मराठा समाजाच्यावतीने मी मागणी केली" असे संभाजी राजे म्हणाले. "ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या हातात आहेत, त्यासाठी केंद्राकडे जाण्याची गरज नाही, त्याबद्दल मी शरद पवारांशी चर्चा केली. एकूणच चर्चा सकारात्मक झाल्याचे संभाजी राजेंनी सांगितले." (I told sharad pawar about feelings of Maratha community on maratha reservation sambhaji raje)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज संभाजी राजेंनी सिल्वर ओकवर येऊन भेट घेतली. संभाजी राजे सिल्वर ओकवर येण्याआधी साडेआठ वाजता अजित पवार आणि नऊ वाजता दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील देखील सिल्वर ओक वर पोहचले होते. संभाजी राजे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते मराठा समाजातील विविध नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची मतं जाणून घेत आहेत.

sambhaji raje bhosle 1.jpg
Covid Update: मुंबईत गेल्या दीड महिन्यातील सर्वात कमी मृत्यू

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संभाजी राजे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यायची होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (narendra modi) संभाजी राजेंना (Sambhaji Raje) भेटीसाठी वेळ दिली नाही. त्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका सुरु आहे.

sambhaji raje bhosle 1.jpg
रोमानियाची कंपनी BMC ला फायझरचे १ कोटी डोस देण्यास तयार पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कंगना रणावत, प्रियांका चोप्राला भेटीसाठी वेळ दिली. पण संभाजी राजेंना भेटण्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत, अशी टीका सचिन सावंत यांनी केली. प्रियांका आणि कंगना मोदींना कशा भेटू शकतात? त्यांना भेट देण्यावर कोणताही आक्षेप नाही. पण संभाजी राजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे असे सचिन सावंत यांनी म्हटलं होतं. शैक्षणिक क्षेत्र आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने पाच मे रोजी झालेल्या सुनावणीत रद्द केला. या कायद्याला सर्वोच्च न्यायालयान असंवैधानिक ठरवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com