esakal | रोमानियाची कंपनी BMC ला फायझरचे १ कोटी डोस देण्यास तयार पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai corona vaccination

रोमानियाची कंपनी BMC ला फायझरचे १ कोटी डोस देण्यास तयार पण...

sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

सकाळ: फायझरची लस पुरविण्याची तयारी दाखवणाऱ्या कंपनीने महापालिकेकडे अ‍ॅडव्हान्स पेमेंटची मागणी केली आहे. युरोप मधील रोमानिया देशातील ओटू ब्ल्यू एनर्जी (Romanian company) एसआरएल असे या कंपनीचे नाव आहे. पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. मात्र, लस पुरविण्यासाठी (bmc vaccine procurement) इच्छुक कंपन्यांना अर्ज करण्याची मुदत १ जून पर्यंत असल्याने त्यानंतरच याबाबत निर्णय होईल असे सांगण्यात आले. (Romanian company ready to provide 1 crore doses of pfizer vaccine to bmc but demanded advance payment)

कोविड प्रतिबंधक लसींच्या एक कोटी डोसेससाठी महापालिकेने जागतिक स्वारस्याची अभिरुची मागवली आहे. त्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पर्यंत आठ पुरवठादारांनी अर्ज केले असून त्यातील सात पुरवठादारांनी स्पुटनिक आणि रोमानियाच्या या पुरवठादाराने फायझर लस पुरविण्याची तयारी दाखवली आहे.

हेही वाचा: मुंबईत लसीकरणाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडतेय एक मोठी गोष्ट

मात्र, या पुरवठादाराने एक कोटी डोसची संपूर्ण किंमत पुरवठा सुरु होण्यापूर्वीच मागितली आहे. या कंपनीच्या अर्जाची पूर्णपणे पडताळणी करण्यात येईल. सर्वच अर्जाची पडताळणी करुनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व पुरवठादारांना अधिक कागदपत्र सादर करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: घाटकोपरमध्ये 'सेक्सटॉर्शन' रॅकेटचा पर्दाफाश

तसेच नवे अर्ज सादर करण्यासाठी मुदत आहे.त्यामुळे मुदतीनंतर याबाबत सर्व पडताळणी करुन अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.  पालिकेकडे लस बनविणाऱ्या कंपन्यांकडून थेट अर्ज आलेले नाहीत. तीन कंपन्यांशी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे.