

UPSC Aspirant KBC Contestant Turns Robber
ESakal
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अपयश, प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये सहभाग आणि ट्रॅव्हल व्यवसायात मोठे नुकसान आल्यामुळे एका कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने गुन्हेगारीचा मार्ग निवडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कांदिवलीतील एका ज्वेलर्समधून त्याने तब्बल ५ लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरी केली असून, याप्रकरणी तरुणाला अटक कऱण्यात आली आहे.