सीए परीक्षेत अभय बजोरिया, सूर्यांश अगरवाल प्रथम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मुंबईतील मुलुंडचा धवल चोप्रा देशातून तिसरा आला आहे.

मुंबई : "द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्‌स ऑफ इंडिया'मार्फत घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटन्ट्‌सच्या अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता.16) जाहीर झाला. देशभरातून 15 हजार 3 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 2 हजार 268 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 15.12 टक्के आहे. कोलकाता येथील अभय बजोरिया आणि नोएडातील सूर्यांश अगरवाल हे दोघे देशात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तर जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मुंबईतील मुलुंडचा धवल चोप्रा देशातून तिसरा आला आहे.

आता एमएसईबी देणार मोठा शॉक, वाचा संपुर्ण बातमी

देशात प्रथम आलेल्या अभय बजोरिया आणि सूर्यांश अगरवाल यांना 800 पैकी 603 गुण (75.38 टक्के) मिळाले आहेत. कोलकात्याचाच ध्रुव कोठारी 800 पैकी 577 गुण (72.13 टक्के) मिळवून दुसरा आला. अहमदाबादच्या दर्शन शहा याने 800 पैकी 575 गुण (71.88 टक्के) मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे. सीए फायनल परीक्षेत नाशिकचा कुशल संतोष लोढा याचा देशात पाचवा क्रमांक आला आहे. जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेला 8 हजार 21 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 817 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 10.19 आहे. 

हेही वाचा - दाऊदला तुडवणारा करीम लाला होता तरी कोण? 

वकिली करताना मी सीएचा अभ्यास करत होतो. अभ्यासासाठी खासगी क्‍लासही लावला होता. वेळोवेळी कुटुंबाने मदत केल्याने या यशाचे श्रेय त्यांना देतो. पुढे मी इन्कम टॅक्‍समध्ये लॉ प्रॅक्‍टीस करणार आहे. 
- धवल चोप्रा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: icai ca final result nov 2019