esakal | दाऊदला तुडवणारा 'करीम लाला' होता तरी कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

दाऊदला तुडवणारा 'करीम लाला' होता तरी कोण?

दाऊदला तुडवणारा 'करीम लाला' होता तरी कोण?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

करीम लाला हे नाव मागच्या दोन दिवसांपासून सतत चर्चेत आहे. त्याचं कारण आहे शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केलेलं वादग्रस्त विधान. कॉंग्रेसच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीम लाला याला मुंबईतील पायधुनीमध्ये भेटायला यायच्या असं संजय राऊत एका कार्यक्रमात म्हणाले आणि त्यांच्या या विधांनामुळे सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला जातोय. पण हा करीम लाला होता तरी कोण ? 

करीम लाला होता तरी कोण?

करीम लाला हा मूळचा अफगाणिस्तानचा होता. 'पश्तुन' असलेला करीम लाला २१ व्या वर्षी भारतात आला. छोट्या मोठ्या कामाच्या शोधात त्याने मुंबई गाठली. मात्र त्याच या कामांमध्ये मन रमत नव्हतं. घरचा श्रीमंत असलेल्या करीम लालाच्या महत्वाकांक्षा वाढतच गेल्या, त्याने सर्वात आधी मुंबईच्या ग्रांट-रोड स्टेशनजवळ एक घर भाड्याने घेतलं. त्या घरात त्याने जुगाराचा अड्डा सुरू केला. बघता बघता संपूर्ण मुंबईत त्याच्या या जुगार अड्ड्याची ख्याति पसरली. या जुगार अड्ड्यात त्या वेळचे प्रसिद्ध असे व्यापारी यायला लागले आणि करीम लाला बघता बघता संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध झाला. 

मोठी बातमी - शहीद अशोक कामटे, आपली मालमत्ता जाहीर करा..

करीम लालाच्या वर्चस्वाची लढाई:

त्यावेळी मुंबईत करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदाराजन या तिघांमध्ये मुंबईवर अधिराज्य कोण गाजवणार? यावर संघर्ष सुरू होता. मारामारी, हत्या आणि भांडणं या सगळ्याला कंटाळून तिघांनीही एकमताने मुंबईचे ३ तुकडे केले आणि मुंबई वाटून घेतली. त्यामुळे आपल्या आपल्या भागात या तिघांचेही वर्चस्व स्थापित झालं. 

मोठी बातमी - रायगडच्या 'या' तालुक्यातील लोकं घरं सोडून पळतायेत!
   
करीम लालाकडून दाऊदचा हाफमर्डर:

तस्करीच्या धंद्यात असलेला दाऊद इब्राहीम कासकर म्हणजेच दाऊद आणि त्याच्या भावाने करीम लाला याच्या भागात तस्करी करायला सुरुवात केली. हा सगळं प्रकार समजल्यानंतर करीम लालाने दाऊदला बेदम मारहाण करून त्याचा हाफमर्डर केला. या घटनेनंतरही दाऊदने करीमच्या भागात तस्करी सुरूच ठेवली. याचाच परिणाम म्हणून करीम लालाने १९८१ साली दाऊदच्या भावाची हत्या केली. याचा बदला म्हणून दाऊदनेही १९८६ साली करीम लालाच्या भावाची हत्या केली.

मोठी बातमी - मटणाचा झाला भडका; पाहा नेमकं काय घडलं!

सपूर्ण जीवनभर मुंबईमध्ये आपली दहशत पसरवून १९ फेब्रुवारी २००२ साली म्हणजेच वयाच्या ९०व्या वर्षी करीम लाला याचा मृत्य झाला.   

who was underworld don karim lala and what was his story