
मुंबई : नीक ऑनेस्ट्ली नॅचरल आइस्क्रीम या भारतातील लोकप्रिय आइस्क्रीम ब्रँडने नवरात्रीच्या जल्लोषात सहभागी व्हायचे ठरवले आहे. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांसाठी कंपनीने उपवासफ्रेंडली आइस्क्रीम फ्लेवर आणलेत, त्यामुळे नवरात्रीचा आनंद घेत नवरात्रीच्या उपवासांची परंपराही जतन करता येणे शक्य आहे.
नवरात्र हा भारतीयांसाठी खास सण आहे. यामध्ये मंत्रोच्चार करून, श्लोक व भजने गाऊन व सर्वात महत्त्वाचे म्हणजे नऊ दिवस कडक उपवास करून दुर्गा मातेची पूजा केली जाते. उपवासासाठी नीक ऑनेस्ट्ली नॅचरल आइस्क्रीम चालू शकते, कारण आम्ही सर्व नैसर्गिक घटक, शुद्ध दूध, फळे व सुकामेवा यांचा वापर करतो व हे घटक उपवासफ्रेंडली आहेत. नवरात्रीचा उपवास आरोग्यदायी, पण चवदार असावा असे आम्हाला वाटते. असं नीक ऑनेस्ट्ली नॅचरल आइस्क्रीमचे संचालक संजीव शहा यांनी सांगीतले. महत्वाचे म्हणजे नवरात्रीचा शेवट गोड होण्यासाठी निरनिराळे फ्लेवर , विविध रंगात कंपनीने सादर केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.