

ICU Patient Dies After Rat Bite Incident
esakal
Mumbai ICU Patient Dies After Rat Bite: भाईंदर पश्चिमेतील पं. भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या ८९ वर्षीय महिलेचा हात चक्क उंदराने कुरतडल्याची घटना घडली. ही बाब सोमवारी (ता. १६) पहाटे लक्षात आली. दरम्यान, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्या महिलेचा मृत्यू झाला. सुहासिनी माठेकर असे मृत्यू महिलेचे नाव असून, त्यांना श्वास घेण्यास त्रास व हृदयविकाराचा झटका आल्याने १२ मार्चला पं. भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. Rat Bite Case Raises Hospital Safety Concerns