'आले साखरपुडासाठी; केला विवाह'!.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत आदर्श विवाह संपन्न

शरद भसाळे
Monday, 21 December 2020

संपुर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झालेला असतानाच नागरिकांच्या मनातील भीती मात्र कमी झालेली नाही.

भिवंडी :- संपुर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झालेला असतानाच नागरिकांच्या मनातील भीती मात्र कमी झालेली नाही. त्यामुळे सर्वत्र सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दीवर बंदी आलेली असल्याचा विचार करून भिवंडी मध्ये साक्षीगंधासाठी आलेल्या मंडळींनी आपसात बैठक करून साक्षीगंध सोहोळ्यामध्येच आदर्श विवाह संपन्न केला.

सिडकोतील कामगार नेत्यांची दलाली रडावर; दक्षता विभागाने माहिती मागवली 

भिवंडीतील बी एन एन महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा राजेंद्र डोंगरदिवे यांची कन्या क्षितिजा हिचा साक्षीगंध बुलढाणा जिल्यातील खामगाव येथील रहिवाशी असलेले विजय नारायण महाले यांचा मुलगा विशाल यांच्यासोबत लग्नाची बोलणी झाली होती,13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता साक्षीगंध(साखरपुडा) करण्याचे निश्चित केले होते, प्रा राजेंद्र डोंगरदिवे यांनी आपल्या कार्यात कोणतेही विघ्न नको म्हणून रीतसर तहसीलदार कार्यालयाकडून परवानगी घेऊन सर्व कायदे व नियम पाळून छोटेखानी आरास केली होती, साक्षीगंधासाठी आलेल्या महाले कुटुंबियांनी सदरची आरास पाहता ते भारावून गेले, व त्यांच्या मनात आले की आपण या संस्कार मंचावर मंगल परिणय का करू नये? असा प्रस्ताव डोंगरदिवे कुटुंबियांसमोर मांडला, त्यानंतर महाले आणि डोंगरदिवे यांचेकडील नातेवाईकांमध्ये सांगोपांग चर्चा विनिमय होऊन सध्याची कोरोना सदृश परिस्थिती पाहता साक्षीगंधासोबतच आदर्श विवाह संपन्न करण्यात आला, सदरचा आदर्श विवाह पार पाडण्याचे काम बौधाचार्य संतोष चव्हाण यांनी केले.

मुंबई , ठाणे परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या कार्यक्रमाला बी. एन. एन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा अशोक वाघ, प्रा.सावंत, जाधव सर, व इतर शिक्षक मंडळी, तसेच भिवंडी पालिका चे जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले व इतर मान्यवर उपस्थित होते, एकीकडे लाखो रुपये खर्च करून पैशांची उधळण करणारांना ही चपराक असून समाजामध्ये सामाजिक संदेश मिळावा म्हणून नवदाम्पत्यानी आणि त्यांच्या पालकांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

The ideal marriage took place in Bhiwandi in corona period 

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ideal marriage took place in Bhiwandi in corona period