esakal | आदर्श शिक्षकांचा गोदावरी बँकेत सन्मान
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

आदर्श शिक्षकांचा गोदावरी बँकेत सन्मान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गोदावरी (Godavari) बँकेच्या (Bank) माध्यमातून विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि जगण समृद्ध करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात करण्यात आला. गोदावरी अर्बन (Godavari Urban) शाखा प्रशासकीय कार्यालय,नरिमन पॉइंट (Nariman Point) व परीसरातील आदर्श शिक्षकांचा सन्मान पार पडला.

संस्थापक अध्यक्ष मा,खासदार हेमंत पाटील , राजश्रीताई पाटील ,व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या गोदावारी अर्बन ने आपल्या उत्कृष्ठ कार्य कौशल्याने विविध पुरस्कार अल्पावधीतच प्राप्त केले. सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा बँको पुरस्कार गोदावरीने सतत पाच वर्ष आपल्या पदरात पाडलाय. अनेक सामाजिक उपक्रम बँक राबवत असते. शिक्षक दिनाचा उपक्रम बँक दरवर्षी राबविते. आज झालेल्या कार्यक्रमात प्रशासकीय कार्यालय नरिमन पॉइंट शाखेचे व्यवस्थापक विकास राजवाडे , निकिता शाह,सविओना वाझ ,चेतना अगोला , यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा: शिष्यवृत्तीतील यशामुळे शिक्षकांना चारचाकी भेट!

गोदावरी नदीवर अधारीत मनोज बोरगावकर यांच्या ‘नदिष्ठ’ या कादंबरी ने साहित्य क्षेत्रात अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. लेखकाच्या हस्ते त्यांच्या स्वाक्षरी केलेली कादंबरी शिक्षकांना देऊन गौरव करण्यात आला. यावेळी लुसी डिसुझा, लिना रॉड्रीक्स, शरिना डिमेलो, डायना कायडो, इवेट सांतामारिया , प्रदिप राज , कोमल मेहता , मित्तल कामदार ,या शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

loading image
go to top