आजपासून आयडॉल अंतिम वर्षाच्या परीक्षा; ऑनलाईन पद्धतीने होणार परीक्षा

तेजस वाघमारे
Monday, 19 October 2020

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) स्थगित केलेल्या अंतिम वर्षाच्या व बॅकलॉग परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) स्थगित केलेल्या अंतिम वर्षाच्या व बॅकलॉग परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा 19 ऑक्‍टोबरपासून सुरू होत असून, त्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. आयडॉलच्या एकूण 21 पैकी 17 परीक्षा सोमवारपासून (ता.19) सुरू होत असून, अन्य चार परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

मार्वे बीच, मालवणीतील खारफुटींवर अवैध भराव; पर्यावरणवाद्यांची पोलिसांत तक्रार 

आयडॉल परीक्षेचे सर्व्हरवर सायबर अटॅक झाल्याने या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार परीक्षा घेण्यासाठी आयडॉलने कंपन्यांकडून निविदा मागविल्या होत्या. परीक्षा घेण्यास कंपनीची नेमणूक झाल्यानंतर आयडॉलने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार अंतिम वर्ष विज्ञान शाखेची (आयटी सत्र 6), तृतीय वर्ष विज्ञान शाखेची (संगणक विज्ञान), पदवीत्तर विज्ञान शाखा भाग 2 गणित, माहिती तंत्रज्ञान व संगणक विज्ञान व पदवीत्तर शिक्षणशास्त्र भाग 2 या परीक्षा व बॅकलॉगच्या प्रथम व द्वितीय वर्ष कला शाखा व वाणिज्य, विज्ञान शाखा आयटी सत्र 4 व 5 आणि एमसीए सत्र 1 ते 5 या परीक्षा 19 ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहेत.

युरोपात घुमले वसईचे सुर, भावाच्या लग्नात बहिणीची अनोखी भेट

या सर्व परीक्षांच्या सराव परीक्षा पूर्ण झालेल्या आहेत; तर तृतीय वर्षे कला व वाणिज्य या परीक्षा 26 ऑक्‍टोबर 2020 पासून ऑनलाईन सुरू होत असून, पदव्युत्तर वर्ष द्वितीय वर्ष एमएची परीक्षा 2 नोव्हेंबर 2020 पासून, तर द्वितीय वर्ष पदव्युत्तर वाणिज्य शाखेची परीक्षा 6 नोव्हेंबर 2020 पासून ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. या परीक्षेच्या सराव परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहेत, असे आयडॉलचे उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी सांगितले.
-------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Idol final year exams from today The exam will be conducted online