esakal | मार्वे बीच, मालवणीतील खारफुटींवर अवैध भराव; पर्यावरणवाद्यांची पोलिसांत तक्रार 
sakal

बोलून बातमी शोधा

मार्वे बीच, मालवणीतील खारफुटींवर अवैध भराव; पर्यावरणवाद्यांची पोलिसांत तक्रार 

मुंबईतील खारफुटींचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. मार्वे बीच तसेच मालवणी परिसरात अवैध भराव टाकून प्लॉट बनवण्याचे काम बिनदिक्कत सुरू आहे

मार्वे बीच, मालवणीतील खारफुटींवर अवैध भराव; पर्यावरणवाद्यांची पोलिसांत तक्रार 

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईतील खारफुटींचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. मार्वे बीच तसेच मालवणी परिसरात अवैध भराव टाकून प्लॉट बनवण्याचे काम बिनदिक्कत सुरू आहे. त्यामुळे खारफुटीचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर असून, लॉकडाऊनमध्ये सक्रिय झालेले काही भूमाफिया यामागे असल्याचा संशय पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केला आहे. 

शहापूरमध्ये 107 गावांतील पिके उद्‌ध्वस्त; 3 हजार शेतकऱ्यांना फटका

मार्वे बीच तसेच मालवणी परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर अवैध भराव टाकणे सुरू आहे. डंपरच्या साह्याने रातोरात समुद्रकिनाऱ्यांवर हे भराव केले जात आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान मागील पाच महिन्यांपासून काम वेगाने सुरू आहे. पोलिस प्रशासनही कोव्हिड नियंत्रण कामात व्यस्त असल्याने त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले. याचाच फायदा उचलून हे भराव करण्यात येत आहेत. 
मार्वे बीच तसेच मालवणी परिसरात मोठ्या प्रमाणावर खारफुटी तसेच तिवरांची झाडे आहेत. या झाडांवर मातीचे ढिगारे तयार केले आहेत. या जागी झोपड्या उभारण्याचे काम सुरू आहे; मात्र मातीच्या ढिगाऱ्यांखाली खारफुटी तसेच तिवरांची झाडे दबून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे भराव असेच सुरू राहिले तर खारफुटी नष्ट होण्याची भीती पर्यावरणवादी व्यक्त करत आहेत. 

नवरात्र उपवासात आहाराचा समतोल सांभाळा, प्रतिकार शक्ती टिकवण्याचा आहारतज्ञांचा सल्ला

एकीकडे भराव टाकण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे मालवणी परिसरात अवैध रेतीउपसाही सुरू आहे. रात्री उशिरा रेतीउपसा करण्यात येत असून, डंपर भरून रेती वाहून नेली जात आहे. स्थानिक रहिवाशांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती वॉचडॉग फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना दिली. त्यांनी याविरोधात मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

लॉकडाऊनचा फायदा उचलत ही अवैध कामे सुरू आहेत. यामागे भूमाफियांची टोळी सक्रिय असण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली; मात्र पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली नाही. याबाबत मुख्यमंत्री तसेच पर्यावरणमंत्र्यांकडेही तक्रार दाखल केली असून, ते याची दखल घेऊन कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. 
- गॉडफ्राय पिंपेटा,
वॉचडॉग फाऊंडेशन 

-------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image