esakal | आदर पुनावालांनी मागणी केली तर अतिरिक्त सुरक्षाही पुरवू
sakal

बोलून बातमी शोधा

adar-poonawalla

आदर पुनावालांनी मागणी केली तर अतिरिक्त सुरक्षाही पुरवू

sakal_logo
By
सुनिता महामुणकर - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ (serum ceo) आदर पुनावाला (adar poonawala) यांनी स्वतः अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली तर राज्य सरकार त्यांना सुरक्षा पुरवेल अशी हमी आज मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारकडून देण्यात आली. राज्यासह देशात आणि जगभरात कोरोना प्रतिबंधक (corona vaccine) लस पुरविणारे पुनावाला सध्या लंडनमध्ये आहेत. लस पुरविण्यासाठी अनेक बड्या राजकीय नेत्यांकडून धमकविण्यात आले, असा कथित आरोप त्यांनी परदेशी मिडियावर केला आहे. (If adar poonawala demanded extra security cover we will provide him statr govt in mumbai high court)

या पार्श्वभूमीवर एड दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. पुनावाला यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी आणि या आरोपांची चौकशी करावी अशी मागणी याचिकेत केली होती. न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठापुढे आज यावर सुनावणी झाली.

हेही वाचा: वर्सोव्यात संगीतकार ठरला सेक्सटॉर्शनचा बळी

याबाबत गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह चर्चा झाली असून पुनावाला यांनी मागणी केल्यास त्यांना सुरक्षा पुरवण्यात येईल, असे प्रमुख सरकारी वकील दिपक ठाकरे यांनी खंडपीठाला सांगितले. न्यायालयाने हे विधान नोंदवून घेतले आणि याचिका निकाली काढली. पुनावाला यांनी स्वतः सुरक्षेची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांच्या अपरोक्ष खंडपीठ असे आदेश देऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. पुनावाला सध्या कुटुंबासह लंडनमध्ये आहेत.